शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भोर नगरपालिकेची विशेष सभा झाली

By admin | Updated: May 22, 2015 00:25 IST

नगराध्यक्षा मात्र गैरहजर; सुमारे ४ कोटी २८ लाखांच्या विकासकामांना मंजुरी

नगराध्यक्षा मात्र गैरहजर; सुमारे ४ कोटी २८ लाखांच्या विकासकामांना मंजुरी
भोर : भोर नगरपालिकेतील राजकीय वादामुळे शहरातील विकासकामांची कोंडी झाली आहे. सभाच होत नसल्याने कामांना मंजुरी मिळत नव्हती. अखेर जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या विशेष परवानगीने आज विशेष सभा झाली. त्यात विविध कामांसाठी सुमारे ४ कोटी २८ लाख रुपयांच्या विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, मात्र, नगराध्यक्षा दीपाली शेटे मात्र या सभेलाही गैरहजर राहिल्या.
१५ दिवसांत सभेचे आयोजन केले नाही. त्यामुळे काँॅग्रेस नगरसेवकांनी वेळोवेळी मागणी करूनही नगराध्यक्षा दीपाली शेटे यांनी सभेचे आयोजन केले नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन सभेचे आयोजन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी २० मे रोजी सभेचे आयोजन करून सभेचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांची निवड करण्यात आली होती.
आज दुपारी एक वाजता नगरपालिकेच्या शिवाजी सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. या वेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक तर राष्ट्रवादीचे ३ जण हजर होते.
या सभेमुळे भविष्यात शहरातील वीज, पाणी, कचरा हे प्रश्न मार्गी लागणार आहेत. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सभेलाच नगराध्यक्षा गैरहजर राहिल्या असा आरोप पत्रकार परिषदेत काँग्रेस नगरसेवकांनी केला. या वेळी उपनगराध्यक्ष तानाजी तारु,नगरसेवक चंद्रकांत सागळे, उमेश देशमुख, ॲड. जयश्री शिंदे, डॉ. विजयालक्ष्मी पाठक, गजानन दानवले, तृप्ती किरवे, देविदास गायकवाड उपस्थित होते.
चौकट...........
आजच्या सभेत वैशिष्ट्यपूर्ण योजनेांर्गत मंजूर झालेल्या १ कोटी ३५ लाख रु. निधीमधून स्वागत कमान सुशोभीकरण २० लाख रु., स्मशानभूमी घाट बांधणे २० लाख रु., महाड-पंढरपूर रोड ते वाघजाई मंदिर रस्ता ४५ लाख रु., तर विशेष सर्वसाधारण अनुदानातून अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी २८ लाख रु., नगरपालिकेच्या उर्वरित कामासाठी एक कोटी ३५ लाख रु., असे एकूण ४ कोटी २८ लाखांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. या शिवाय शहरातील आरोग्य, वीज, कचरा, पाण्याचा ठेका या कामांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.

चौकट : भोर शहराचा विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठवण्यासाठी नगराध्यक्षांकडे सही करण्यासाठी तो पाठवला. मात्र, त्यावर त्यांनी सही केली नाही . आराखड्यावर त्यांची हरकत होती. हरकत घेण्यासाठी ३ डिसेंबरच्या सभेला हजर नव्हते. आणि आता पाच महिने झाल्यावर आमदार व नगरसेवकांवर सूडबुद्धीने बिनबुडाचे आरोप केले. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे काँग्रेस नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस नगरसेवकांनी विकास आराखडा समितीत मला घेतले नाही आणि आराखडा बनवताना विश्वासात न घेताच नगरसेवकांचे हितसंबंध जपणारा आराखडा तयार करण्यात आला. शिवाय या संंबंधीचे सर्व अधिकार मुख्याधिकारी यांनाच दिल्याने मी सदरच्या आराखड्यावर सही केली नाही, असे नगराध्यक्षा दीपाली शेटे यांनी सांगितले.