शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर मुंबई पोलिसांना मिळणार उच्च दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेट

By admin | Updated: May 10, 2017 16:50 IST

चौकशीअंती ही जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचंही सिद्ध झालं होतं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात भारताच्या तीन पोलिसांनी वीरमरण पत्करलं. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून 26/11ला हल्ला करणा-या दहशतवाद्यांचा सामना केला होता. मात्र दहशतवाद्यांच्या एके 47 पुढे करकरेंच्या जॅकेटचा निभाव लागला नाही आणि ते शहीद झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि इन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर हे दोघेही निकृष्ट दर्जाच्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळेच शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर चौकशीअंती ही जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचंही सिद्ध झालं होतं. मात्र आता लवकरच मुंबई पोलिसांना दर्जेदार लष्करी बुलेटप्रूफ जॅकेट मिळणार आहेत. महाराष्ट्र पोलीस विभागानं 5000 एमकेयू जॅकेट्स खरेदी करण्यासाठी कानपूरमधल्या लष्करी उपकरणे उत्पादकांना ऑर्डर दिली असून, लवकरच ते जर्मनीवरून ही उच्च दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेट आयात करणार आहेत. गेल्या वेळी 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 साली महाराष्ट्र पोलिसांनी बुलेटप्रूफ जॅकेट विकत घेतली होती. मात्र ती विकत घेतलेली जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचं 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातून सिद्ध झालं होतं. तसेच या जॅकेटला 9 एमएमच्या पिस्तूलमधून सुटलेली गोळीही भेदू शकते हे एका चाचणीतून समोर आलं होतं. महाराष्ट्र पोलिसांची संख्या 2 लाख असतानाही त्यांनी फक्त 2000 बुलेटप्रूफ जॅकेट विकत घेतली होती. त्यांचा पुरवठा मार्च 2011मध्ये करण्यात आला होता. आता 32,474 कोटी रुपयांमध्ये महाराष्ट्र सरकार ही नवी बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी करणार असून, ती पोलीस विभागातल्या वेगवेगळ्या युनिटमध्ये वितरीत करण्यात येणार आहेत. नवी बुलेटप्रूफ जॅकेट मुंबई पोलीस, शीघ्र कृती दल, फोर्स वन, राज्य राखीव पोलीस दल, विशेष कृती दल, गडचिरोली पोलीस आणि नक्षली भागांमधल्या पोलिसांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली आहे. विकत घेण्यात येणा-या बुलेटप्रूफ जॅकेटच्या नमुन्याची चंदीगढमधल्या केंद्रीय फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी ती बुलेटप्रूफ जॅकेट एके 47, सेल्फ लोडेड रायफल्स सारख्या बंदुकांच्या गोळ्या भेदू शकत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तरीही जूनमध्ये ती जॅकेट आल्यावर त्याची आम्ही पुन्हा एकदा केंद्रीय फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणी घेणार असल्याचंही व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितलं आहे.