शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील वक्तव्याप्रकरणी कुमार विश्वास यांच्याविरोधात तक्रार दाखल

By admin | Updated: January 31, 2015 17:59 IST

अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - दिल्ली विधानसभा निवडणूकीला अवघा आठवडा उरलेला असताना भाजपा आणि आपमध्ये चांगलचे युद्ध पेटले आहे.  अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप ठेवत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर भाजपाने माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, असे विश्वास यांनी ठणकावून सांगितले आहे. 
 
प्रचारसभेदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत विश्वास यांनी एक अश्लील टिप्पणी केली, असा आरोप बेदींनी केला असून याप्रकरणी भाजपाने निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.  ' असे अनैतिक, विषारी आणि विकृत विचार करणा-यांना समाजापासून दूर करण्याची गरज आहे, असे ट्विट बेदींनी केले आहे. ज्या पक्षाच्या नेत्याचे विचार महिलाविरोधी असतील आणि ज्याची विकृत मानसिकता असेलस अशा व्यक्तीकडून महिला सुरक्षा आणि सन्मानाची अपेक्षा कशी करणार असा सवालही बेदींनी विचारला आहे.
कुमार विश्वास यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.  बेदी जनतेची दिशाभूल करत आहेत, त्यांनी माझे वक्तव्य लक्ष देऊन ऐकावे, आपले वक्तव्य बेदी यांना उद्देशून नव्हे तर भाजपाला उद्देशून असल्याचे  स्पष्टीकरण विश्वास यांनी दिले. 
 
काय आहे वक्तव्य?
कुमार विश्वास यांच्या ज्या वक्तव्यावरून एवढा वाद निर्माण झाला आहे , ते वक्तव्य नेमके आहे तरी काय?
एका रॅलीदरम्यान कुमार विश्वास यांनी भाजपावर हल्ला चढवल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ब-याच काळापासून बीजेपी अरविंद केजरीवाल यांच्यातील उणिवा शोधण्याचे काम करत आहे. त्यांना दोन उणिवा मिळाल्या. पहिली उणीव म्हणजे, केजरीवाल हे मफलर घालतात. पण केजरीवाल यांनी मफलर चोरला आहे का असा सवाल विचारताना विश्वास दिसत आहेत आणि केजरीवाल यांच्यातील दुसरी उणीव म्हणजे ते खूप खोकतात. तुम्हाला त्याचा काय त्रास झाला, तुम्ही काय त्यांच्यासोबत त्यांच्या बेडरूममध्ये झोपता का? असा सवाल विश्वास यांनी भाजपाला विचारला.