शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा मिनिटात पावणे सहा लाखाची हातसफाई

By admin | Updated: July 20, 2016 23:49 IST

जळगाव: शहरात घरफोडीचे सत्र सुरुच असून मंगळवारी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड झाल्यानंतर सिंधी कॉलनीला लागून असलेल्या संत कंवरराम नगरातही वासुमल संत कंवरराम टॉवरमध्ये वासुमल तेजुमल दासवाणी (वय ४०) या व्यापार्‍याकडे धाडसी घरफोडी झाली आहे. कडीकोयंडा तोडून अवघ्या पंधरा मिनिटात चोरट्यांनी दोन लाखाची रोकड व पावणे तीन लाखाचे दागिने लंपास केले आहेत. विशेष म्हणजे ही घरफोडीदेखील मंगळवारीच झाला आहे. बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव: शहरात घरफोडीचे सत्र सुरुच असून मंगळवारी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड झाल्यानंतर सिंधी कॉलनीला लागून असलेल्या संत कंवरराम नगरातही वासुमल संत कंवरराम टॉवरमध्ये वासुमल तेजुमल दासवाणी (वय ४०) या व्यापार्‍याकडे धाडसी घरफोडी झाली आहे. कडीकोयंडा तोडून अवघ्या पंधरा मिनिटात चोरट्यांनी दोन लाखाची रोकड व पावणे तीन लाखाचे दागिने लंपास केले आहेत. विशेष म्हणजे ही घरफोडीदेखील मंगळवारीच झाला आहे. बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
वासुमल दासवाणी यांचे गोलाणी मार्केटमध्ये नीरज ऑटो म्हणून स्पेअर पार्टचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता ते घरुन दुकानात आले होते तर पत्नी अरुणा या संध्याकाळी सिंधी कॉलनीतील मंदिरात गेल्या होत्या. तिघं मुले सव्वा पाच वाजता क्लासला गेले होते. तेथून सहा वाजता मुले घरी आले असता पायल नावाच्या मुलीला घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला तर घरात कपाट उघडे दिसले.ती घाबरतच बाहेर आली. शेजारीच्या महिलेला झाल्याप्रकाराची माहिती दिली. त्यांनी अरुणा व वासुमल यांना फोन करुन घरात काही तरी प्रकार झाल्याचे कळवले.
अन् पती-पत्नी धावत आले
घरात नेमके काय झाले असावे म्हणून अरुणा व वासुमल दासवाणी धावपळ करत घरी आले. घराची पाहणी केली असता दरवाजा कडीकोयंडा तुटलेला होता. बेडरुममधील कपाट उघडे होते. त्यातील दोन लाख रुपये रोख, १२.५ तोळे दागिने त्यात सहा तोळ्याचे दोन कंगण,४.५ तोळ्याच्या सोन्याच्या बांग्गड्या, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, चांदीचे ६० ग्रॅमचे एक कडे रक्कम व दागिने गायब झालेले होते.
मागील बाजूने आले चोरटे
दर्शनी भागातून वर्दळ असल्याने चोरट्यांनी मागील बाजूने येवून घरात प्रवेश केला. पंधरा ते २० मिनिटात कुलूप, कडी-कोयंडा तोडून व कपाटातील ऐवज त्यांनी लंपास केला. ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने चोरटे परत गेले. मागील बाजूस तुटलेली इमारत असल्याने तो मार्ग येण्यास सोपा आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. फिंगरप्रिंटही घेण्यात आली. बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.