शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

By admin | Updated: October 8, 2016 05:03 IST

सूर्योदयापासूनच त्यांची दिनचर्या सुरु होते. अगदी सामान्य व्यक्तींसारखे तेही कामासाठी सकाळीच बाहेर पडतात

भोपाळ : सूर्योदयापासूनच त्यांची दिनचर्या सुरु होते. अगदी सामान्य व्यक्तींसारखे तेही कामासाठी सकाळीच बाहेर पडतात आणि सायंकाळी घरी परतात. कुटुंबासह सुखाचे चार घास खाउन ते विश्रांती घेतात. अर्थात, हे मध्यप्रदेशच्या होशंगाबादमधील कैदी आहेत आणि हो, कैदी असूनही त्यांची ही दिनचर्या अशीच सुरु आहे. साहजिकच, त्यांच्या मुक्त वावरण्यावर कुणालाही प्रश्न पडेल. पण, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे हे प्रयत्न सरकारकडून जाणीवपूर्वक सुरु आहेत. होशंगाबादच्या १७ एकरमधील या विस्तीर्ण खुल्या कारागृहात शंकर, इम्रान, मांगीलाल, धर्मेंद्र, जितेंद्र, हरिराम, महेश आदि कैदी कुटुंबासह राहतात. सायंकाळी दमून आल्यानंतर विरंगुळा म्हणून ते आवर्जुन टीव्ही पाहतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा ही दिनचर्या सुुरु होते. मध्यप्रदेश सरकारने खुल्या कारागृहाची संकल्पना प्रत्यक्षात आणली त्यालाही आता पाच वर्षे उलटले आहेत. ३२ कोेटी रुपये खर्चून सरकारने खुल्या कारागृहाची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. या ठिकाणी २५ कैदी एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्यासाठी खास घरेही बनविण्यात आली आहेत. मध्यप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुशोभन बॅनर्जी यांनी सांगितले की, कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शिक्षेच्या शेवटच्या एक दोन वर्षांच्या काळात या खुल्या कारागृहात ठेवले जाते. अर्थात यासाठी नियमावली आहे. ती पूर्ण करणाऱ्या कैद्यांनाच येथे संधी दिली जाते. ज्यांची वर्तणूक चांगली आहे अशाच कैद्यांना खुल्या कारागृहात पाठविले जाते. दरम्यान, , होशंगाबादचा खुल्या कारागृहाचा प्रयोग यशस्वी झालेला आहे, असेही बॅनर्जी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)>उदरनिर्वाहासाठी भाजी विक्रीखुल्या कारागृहातील कैदी मुकेश केवटने सांगितले की, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. कोणी कँटीन चालवितो तर कोणी फळांची विक्री करतो. आम्ही कुटुंबासह राहतो आणि आमची मुले शाळेतही जातात. एकूणच काय तर या कैद्यांसाठी आता अंधाराचे जाळे संपले असून ते मोकळा श्वास घेउ लागले आहेत.