शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये संघ, कम्युनिस्टांच्या कार्यालयांवर भीषण हल्ले

By admin | Updated: March 4, 2017 04:35 IST

केरळमध्ये एलाप्पुल्लीत (जि. पलक्कड) गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या हल्ल्यात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाचे (डीवायएफआय) तीन कार्यकर्ते जखमी झाले

नवी दिल्ली : केरळमध्ये एलाप्पुल्लीत (जि. पलक्कड) गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या हल्ल्यात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाचे (डीवायएफआय) तीन कार्यकर्ते जखमी झाले. रतीश (३०), युसुफ (३१) आणि सुधीश (२८) अशी जखमींची नावे आहेत. हल्लेखोर मोटारबाईक्सवर आले होते. डीवायएफआय ही मार्क्सवादी पक्षाची विद्यार्थी शाखा आहे. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीत हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे म्हटले असले तरी त्याला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.कोळिकोड जिल्ह्यातील कल्लाची येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर गुरुवारी झालेल्या हल्ल्याच्या काही तास आधी पलक्कड येथे हल्ला झाला. त्यात रा. स्वं. संघाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना कोळिकोडमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. हा हल्ला कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उज्जैन येथील नेते कुंदन चंद्रावत यांनी गुरुवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे शिर कापणाऱ्यास एक कोटी रुपये बक्षीस देईन, असे जाहीर केले होते. केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या मृत्युसाठी उज्जैनमधील संघाचे सह प्रचार प्रमुख कुंदन चंद्रावत यांनी विजयन यांना जबाबदार धरले आहे. जो कोणी विजयन यांचा शिरच्छेद करून ते घेऊन येईल त्याला मी माझी मालमत्ता विकून एक कोटी रुपये बक्षीस देईन कारण विजयन हे संघाच्या कार्यकर्त्यांचे मारेकरी आहेत, असे चंद्रावत म्हणाले होते. पिनराई विजयन म्हणाले की.‘‘अशा वक्तव्यांमुळे मला त्रास होत नाही. वक्तव्याचा निषेध करून मी ती धमकी धुडकावून लावतो.’’ संघाने चंद्रावत यांच्या विधानापासून सुरक्षित अंतर राखले आहे. आमचा हिंसाचारावर कधीही विश्वास नसून आमचा लोकशाही मार्गांनी निषेधावर विश्वास आहे. कुंदन चंद्रावत यांनी भावनेच्या भरात केलेल्या विधानांचा आम्ही निषेध करतो, असे संघाने म्हटले. >कुंदन चंद्रावत यांची संघातून हकालपट्टी केरळचे मुख्यमंंत्री पिनाराई विजयन यांचे शिर कलम करणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य कुंदन चंद्रावत यांची शुक्रवारी संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे.संघाचे मध्यप्रदेशचे प्रमुख प्रकाश शास्त्री यांनी ही कारवाई करत कुंदन चंद्रावत यांना संघाच्या सर्व पदांवरुन दूर केले आहे. चंद्रावत यांनी गुुरुवारी उज्जैैनमध्ये हे विधान केले होते. चंद्रावत हे संघाचे उज्जैनमधील सह प्रचार प्रमुख होते. केरळात माकपच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांची हत्या होत असून त्याचा बदला घेण्यासाठी चंद्रावत यांनी हे बक्षिस जाहीर केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आज संघाकडून ही कारवाई करण्यात आली.