शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

तरुणावर प्राणघातक हल्ला

तरुणावर प्राणघातक हल्ला
कळमेश्वर : पैशाच्या व्यवहारातून दोघांनी तरुणावर चाकूने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास कळमेश्वर शहरात घडली.
संदीप काशिनाथ तलवे (३५, रा. कळमेश्वर) असे जखमी तरुणाचे नाव असून, मुन्ना ऊर्फ राहुल गिरधर चिमूरकर (२२, रा. कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप व मुन्ना यांच्यात पैशाच्या व्यवहारातून वाद उद्भवला होता. दरम्यान, शनिवारी रात्री मुन्ना हा दाजिबा बारसमोर उभा होता. संदीप हा बारच्या बाहेर पडताच मुन्ना व त्याच्या मित्राने संदीपसोबत वाद घालायला सुरुवात केली. हा वाद विकोपास गेल्याने दोघांनी त्याच्या पोट व पाठीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ३०४ अन्वये गुन्हा नोंदवून मुन्नाला अटक केली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
***
चोरट्यास अटक
नागपूर : बुटीबोरी येथील टीचर कॉलनीत चोरी करणाऱ्या चोरट्यास बुटीबोरी पोलिसांनी अटक केली. चोरीची ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती.
प्रकाश बाबाराव रोकडे (२५, रा. मौदा, ता. पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी सचिन धनराज डाखोळे (२६, रा. टिचर कॉलनी, बुटीबोरी) हे बाहेरगावी गेले होते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून प्रकाशने दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ३८० अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. (प्रतिनिधी)
***
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
खापरखेडा : शेतातील मोटरपंप सुरू करताना विजेचा धक्का लागला आणि त्यातच शेतकऱ्या मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैलवाडा शिवारात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
सुरेश लक्ष्मण जुमडे (४२, रा. बैलवाडा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश जुमडे हे शेतात काम करीत होते. दरम्यान, सायंकाळी त्यांनी मोटारपंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोेंद करून तपास सुरू केेला आहे. (प्रतिनिधी)
***