शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’विषयी चाहत्यांचा भ्रमनिरास

By admin | Updated: April 9, 2015 05:33 IST

भारताच्या राजकीय क्षितिजावर धूमकेतूप्रमाणे उदयास आलेल्या आम आदमी पार्टीवर (आप) लट्टू होऊन देणग्यांचा मुक्तहस्ते वर्षाव

नवी दिल्ली : भारताच्या राजकीय क्षितिजावर धूमकेतूप्रमाणे उदयास आलेल्या आम आदमी पार्टीवर (आप) लट्टू होऊन देणग्यांचा मुक्तहस्ते वर्षाव करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व चाहत्यांचा अलिकडच्या पक्षांतर्गत कलहामुळे भ्रमनिरास होत चालला आहे. यातूनच इंग्लंडमधील एका अनिवासी भारतीय दात्याने पक्षाला वापरण्यासाठी दिलेली व अरविंद केजरीवाल यांची जणू काही ओळख बनलेली निळ््या रंगाची वॅगनआर गाडी परत मागितली आहे. तर लखनऊ येथील एका पक्षसदस्याने आपण तयार करून दिलेल्या बोधचिन्हाचा (लोगो) पक्षाने तात्काळ बंद करावा, असे पत्र केजरीवाल यांना पाठविले आहे.ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले एक चाहते कुंदन शर्मा यांनी आपल्या पत्नीच्या नावे असलेली निळ््या रंगाची वॅगनआर गाडी केजरीवाल यांना वापरण्यासाठी दिली होती. गेले दोन दिवस दिल्लीत आलेल्या शर्मा यांनी एकापाठोपाठ एक अनेक टिष्ट्वट करत ही मोटार परत देण्याची मागणी केली.दुसऱ्या असंतुष्ट कार्यकत्याचे नाव सुनील लाल असे असून आपचे चिन्ह आपण तयार केले असल्याचा त्यांचा दावा आहे.या डिझाईनचे हक्क अद्याप मी हस्तांतरित केले नसल्याने पक्षाने या चिन्हाचा वापर त्वरित थांबवावा. ब्रांडिंग, वेबसाईट, स्टेशनरी, ध्वज, फलक या सर्वांवरून हे चिन्ह काढून टाकावे, असे पत्र त्यांनी केजरीवालांना पाठविले आहे. प्रशांत भूषण, योगेंद्र यादव व आनंदकुमार यांच्यावरील कारवाईने सुनीललाल नाराज आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)