शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाचिक भाषा संपण्याची भीती

By admin | Updated: April 6, 2015 02:54 IST

भाषांचा इतिहास हा सात हजार वर्षांपूर्वीचा आहे. मात्र, आता प्रतिमांची नवी भाषा विकसित होत आहे. भविष्यात भाषा मृत होऊन केवळ प्रतिमांच्या उपयोगातून एक

नम्रता फडणीस, घुमान (संत नामदेवनगरी) भाषांचा इतिहास हा सात हजार वर्षांपूर्वीचा आहे. मात्र, आता प्रतिमांची नवी भाषा विकसित होत आहे. भविष्यात भाषा मृत होऊन केवळ प्रतिमांच्या उपयोगातून एक नवीन बुद्धीवंत प्राणी उदयास येणार आहे. त्यामुळे भाषांचे संगणीकरणाच्या माध्यमातून जतन करणे आवश्यक ठरणार असल्याचे मत ज्येष्ठ भाषा संशोधक गणेशदेवी यांनी रविवारी येथे व्यक्त केले. संमेलनात गणेशदेवी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. प्रकाशक अरूण जाखडे आणि डॉ. सुषमा करोगल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. भारतीय साहित्य अनेक जीभेने बोलले जाते. मराठी साहित्य हा त्यामधीलच एक अद्भूत अविष्कार असल्याचे सांगून गणेशदेवी म्हणाले, मराठी साहित्यामध्ये जे स्त्रीलेखन झाले ते खरच खूप अप्रतिम आहे. कवितांमध्येही विभिन्न अविष्कारांचे दर्शन घडते. तर, गुजराती भाषेमध्ये लघुकथा हा साहित्यप्रकार चांगला आहे. परंतु कुठल्या भाषेला किती मार्क द्यायचे एवढे काही आपण तज्ज्ञ नसल्याचे सांगत आपल्या मोठेपणाची पावतीही त्यांनी उपस्थितांना दिली. भाषेच्या भविष्यावर भाष्य करताना ते म्हणाले, उत्क्रांती मानवाच्या मेंदूत बदल घडत असून, मेंदूचा डाव्या बाजूचा केंद्रबिंदू भाषा नव्हे तर प्रतिमांकडे सरकत चालला आहे. त्यामुळे भाषा मृतवत होऊन रूपक आणि प्रतिकांची ‘व्हर्च्युअल’ (आभासी) भाषा निर्माण होत चालली आहे. त्यामुळे वाचिक भाषा संपेल अशी भिती शास्त्रज्ञांना वाटत आहे. हे प्रदीर्घ काळातील टप्पे असून, त्याच्या एका अंकाच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. यासाठी भाषांचे जतन करणे ही आता काळाची गरज ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.