शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गर्भाच्या हृदयात दोष, वाईच्या महिलेस सहाव्या महिन्यात गर्भपाताची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 03:49 IST

पोटात वाढत असलेल्या मुलाच्या हृदयात गंभीर स्वरूपाचे दोष आहेत व असे मूल जन्माला आले तरी ते फार दिवस जगू शकणार नाही, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एका २४ वर्षांच्या विवाहितेस सहाव्या महिन्यात गर्भपात करून घेण्याची अनुमती गुरुवारी दिली.

 लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पोटात वाढत असलेल्या मुलाच्या हृदयात गंभीर स्वरूपाचे दोष आहेत व असे मूल जन्माला आले तरी ते फार दिवस जगू शकणार नाही, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एका २४ वर्षांच्या विवाहितेस सहाव्या महिन्यात गर्भपात करून घेण्याची अनुमती गुरुवारी दिली.वाई तालुक्यातील वावधन गावात नवीन वसाहतीत साई मंदिराजवळ राहणाºया या गर्भवतीने केलेल्या रिट याचिकेवर न्यायालयाने पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रदीप सांबरे व बाल हृदयशल्यचिकित्सा विभागाचे प्राध्यापक डॉ. नित्यांनंद ठाकूर यांनी याचिकाकर्तीची तपासणी करून अहवाल द्यावा, असा आदेश ४ आॅगस्ट रोजी दिला होता.त्यानुसार डॉ. सांबरे व डॉ. ठाकूर यांच्याखेरीज बी.जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अंजय चंदनवाले, बालरोग विभागाच्या प्राध्यापक डॉ. आरती किणीकर व रेडिओलॉजी विभागाच्या प्राध्यापक डॉ. शेफाली पवार यांच्या मेडिकल बोर्डाने ७ आॅगस्ट रोजी या महिलेची तपासणी करून न्यायालयास अहवाल दिला. असे मूल जन्माला आले तर त्याच्या हृदयावर जोखमीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील व त्यात मूल दगावण्याचाही धोका आहे. शिवाय असे मूल काही काळ जगले तरी रक्तास पुरेशा आॅक्सिजन पुरवठ्याअभावी त्याचे आयुष्य अत्यंत खडतर असेल व ते तारुण्यावस्थेपर्यंत जगणे अशक्य वाटते, असे मत या डॉक्टरांनी अहवालात नमूद केले.न्या. शरद बोबडे आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने या अहवालाखेरीज बंगळुरु येथील ख्यातनाम शल्यचिकित्सक डॉ. देवी शेट्टी यांनी व्यक्त केलेले तशाच स्वरूपाचे मतही विचारात घेतले. जन्माला येणाºया मुलामध्ये गंभीर स्वरूपाचे अपंगत्व येऊ शकेल असे दोष असल्याचे मत दोनहून अधिक डॉक्टरांनी दिले तर गर्भपात प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(२) (बी) नुसार पाचव्या महिन्यांपर्यंत गर्भपात केला जाऊ शकतो, असे खंडपीठाने म्हटले.आठ दिवसांत न्यायवाईसारख्या ग्रामीण भागातील या महिलेला एक हजार किमीहून अधिक दूर असलेल्या दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाकडून मोजून आठव्या दिवशी न्याय मिळाला. २ आॅगस्ट रोजी दाखल केलेली तिची याचिका ४ आॅगस्टला प्रथम सुनावणीस आली. त्या दिवशी तपासणीचा आदेश झाला. ७ आॅगस्टला तपासणी झाली व १० आॅगस्टला गर्भपाताची परवानगी मिळाली.