शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

त्याच्या उपवासाने वडिलांनी सोडला तंबाखू

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

आर्मीत असलेल्या तरुणाने गाव सुधारण्याचा घेतला वसा

आर्मीत असलेल्या तरुणाने गाव सुधारण्याचा घेतला वसा
भोकर : गाव व्यसनमुक्त व्हावं़़़ जन्माला येणार्‍या चिमुकलीचंही स्वागत व्हावं़़़ गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप असावी़़़ यातूनच गावात उन्नती व्हावी़़़ यासाठी आर्मीमध्ये असलेला एक तरूण मागील चार वर्षांपासून धडपडतोय़ गाव व्यसनमुक्त व्हावे यासाठी त्याने चर दिवस पाण्यावर राहून उपवास केला़ मुलाची ही तळमळ पाहून वडिलांनी मात्र तंबाखू बंद करीत एक प्रकारे गावात व्यसनमुक्तीची सुरुवात केली़
भोकर-मुदखेड रस्त्यावरील रिठ्ठा हे गाव़ गावातील बालाजी दिगांबर नागलवाड हा तरूण सध्या आर्मीत आहे़ सध्या तो काशी येथे कार्यरत आहे़ आपलं गाव सुंदर व्हावं, मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी तो धडपड करत आहे़ खेड्यातील चिमुकले इंग्रजीच्या जवळ जावे म्हणून त्याने गावात इंग्लीश स्कूल सुरू केली़ जोडीला वाचनालयही उभारले़ गावातील सामाजिक कामासाठी तो दरवर्षी वेतनामधून मिळालेले २० हजार रुपये खर्च करतो़ यातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्यांनी दोन मुलींवर शस्त्रक्रिया केली अशा आई-वडिलांचा सत्कार, प्रबोधन अशी कामे करीत सामाजिक बांधिलकी जोपासत आहे़
गाव व्यसनमुक्त व्हावे यासाठी त्यांनी रिठ्ठा गावालगत असलेल्या भवानी मंदिरात चार दिवस केवळ पाणी पिवून उपवास केला़ मुलाची ही तळमळ पाहून त्याचे वडील दिगांबर नागलवाड यांनी तंबाखू खाणे सोडून दिले़ खरं तर ही आता सुरुवात आहे व्यसनमुक्तीची़ यानंतर गावात परिवर्तनाचे वारे येतील अशी आशा बालाजी बाळगून आहे़