नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कन्या दमनसिंह यांनी आत्मचरित्र लिहायचे की नाही हे माङो वडीलच ठरवतील असे स्पष्ट केले. आपल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अॅन्ड गुरशरण’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या रविवारी संध्याकाळी बोलत होत्या.
आपल्या पुस्तकात दमनसिंग यांनी डॉ. सिंग दाम्पत्याच्या 193क् ते 2क्क्4 र्पयतच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. यात अमृतसर, पटियाला, होशियारपूर, चंदीगड, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, न्यूयॉर्क, जिनेव्हा, मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी झालेल्या वास्तव्याविषयीचे उल्लेख आहेत.
या आधी दोन पुस्तके लिहिलेल्या दमनसिंग यांनी विक्रमसेठ, सिल्विया नासर व एम.जे. अकबर यांच्या आत्मचरित्रंनी आपल्या पालकांविषयी अत्यंत आस्था व प्रामाणिकपणो लिहिण्याची इच्छा निर्माण झाल्याचे सांगितले. विक्रमसेठ यांनी लिहिलेले टू लाईव्हज हे अतिशय दज्रेदार पुस्तक असून त्याचा आपल्यावर खोल परिणाम झाल्याचे त्या सांगतात. तसेच गणितज्ज्ञ जॉन नॅश यांच्यावर सिल्व्हिया नासर यांनी लिहिलेले पुस्तकही लक्षवेधी आहे आणि एम.जे. अकबर यांनी लिहिलेले नेहरूंचे चरित्रही विलक्षण असल्याचे त्या म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)