शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पिता-पुत्रास लाथा-बुक्क्यांनी मारहाण

By admin | Updated: July 2, 2015 23:47 IST

चाकूर : पेरणी केलेल्या शेतातून जाऊ नकोस असे सांगणार्‍या पिता-पुत्रास एकाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील उमरगा कोर्ट शिवारात घडली आहे़ याप्रकरणी बुधवारी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

चाकूर : पेरणी केलेल्या शेतातून जाऊ नकोस असे सांगणार्‍या पिता-पुत्रास एकाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील उमरगा कोर्ट शिवारात घडली आहे़ याप्रकरणी बुधवारी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तालुक्यातील उमरगा कोर्ट येथील नरेश डोंगरे यांनी शेतामध्ये पेरणी केली होती़ गावातील सोमनाथ मोगले हे डोंगरे यांच्या शेतातून जात होते तेव्हा डोंगरे यांनी मोगले यास शेतातून जाऊ नकोस, असे सांगितले़ तेव्हा मोगले याने नरेश डोंंगरे व त्यांच्या वडीलास शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच हातातील दगडाने डोक्यात मारून जखमी केले़ याप्रकरणी डोंगरे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ वलसे करीत आहेत़


दुचाकी पळविली
चाकूर : घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना तालुक्यातील हणमंत जवळगा येथे घडली आहे़ याप्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तालुक्यातील हणमंत जवळगा येथील लक्ष्मण चाटे यांनी आपली दुचाकी एमएच १३ बीसी ४२८६ ही घरासमोर १७ जून रोजी उभी केली होती़ अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी पळवून नेली़ तिची किंमत २५ हजार रूपये आहे़ याप्रकरणी चाटे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ वलसे करीत आहेत़


फोनवर का बोलतो म्हणून मारहाण
चाकूर : फोनवर का बोलतो, असे म्हणत एकास चौघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील घारोळानजीक घडली आहे़ याप्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात बुधवारी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
घरोळा येथील अंकुश सोळूंके व अन्य तिघांनी झरी बु़ येथील गणपत चव्हाण याच्यावर फोनवर का बोलतोस, असे म्हणत शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच काठीने डोक्यात मारून जखमी केले़ त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकीही दिली़ याप्रकरणी गणपत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ शिवपूजे करीत आहेत़