शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! ४ कोटी रुपयांना विकले गेले गाडीचे टायर्स..

By admin | Updated: June 16, 2016 13:24 IST

हौसेला मोल नसतं असं म्हणतात, हीच उक्ती दुबईत खरी ठरली असून तेथे गाडीच्या टायर्सचा सेट तब्बल ४ कोटी रुपयांना विकला गेला आहे.

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. १५ -  २४ कॅरेट सोनं आणि हि-यांनी मढवलेले चार टायर्स दुबईतील एका कंपनीने बनवले असून ते  तब्बल ४ कोटी रुपयांना (२२ लाख दिराम) विकले गेले आहेत. आत्तापर्यंत एखाद्या गाडीच्या टायर्सना मिळालेली ही सर्वात मोठी किंमत असून दुबईतील 'झेड' या कंपनीने बनवलेल्या या टायर्सच्या सेटची ' गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही नोंद करण्यात आली आहे.
मात्र तब्बल ४ कोटी रुपये किमतीचे हे टायर्स विकत घेणा-याला आता या 'सोनेजडित' टायर्सच्या सुरक्षेसाठीच पहारेकरी तैनात करावे लागतील असे दिसते. कारण चोरांच्या हातात हे घबाड पडल्यास उनकी तो लाईफ बन जायेगी..! त्यामुळेच या टायर्सच्या मालकांला सुरक्षेसोबतच टायर्सचा इन्श्युरन्स (विमा) काढणेही भाग असून एवढ्या किमती टायर्सचा इन्श्युरन्स काढण्यास कोणती कंपनी तयार होईल? हाही एक मोठाच प्रश्न आहे..
दुबईतील 'झेड' कंपनीने प्रथमच असे ४ टायर्स बनवले असूने सोने-हिरेजडित टायर्सचा एकमेव सेट आहे. जगातील एक्स्क्लुझिव्ह ज्वेलर्सपैकी एक असलेल्या इटलीतील आर्टिसन ज्वेलर्सने या टायर्सवरील सजावट केली असून ही टायर्स दुबईत डिझाईन करण्यात आली आहेत. तर अबू धाबीतील राष्ट्राध्यक्षांचे नवे निवासस्थान (महाल) बनवणा-या कारागीरानेच या टायर्वरील सोन्याची सजावट केल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान या टायर्सच्या विक्रीतून मिळालेले ४ कोटी रुपये 'झेनिसेस फाऊंडेशन'ला दान करण्यात येणार आहेत. 
'आम्ही नेहमीच कौशल्य व निष्ठेला महत्व दिले असून त्यामुळे आमची 'झेड' कंपनीला पसंती मिळत आहे. रमझानचा पवित्र महिना सुरू असून तेच लक्षात ठेऊन आम्ही या टायर्सच्या विक्रीतून मिळालेला पैसा जगभरातील शिक्षण व्यवस्थेत सुधार व्हावा यासाठी काम करणा-या 'झेनिसेस' फाऊंडेशनला देण्याचा निर्णय घेतला' असे झेड टायर्सचे प्रमुख परजीव कंधारी यांनी सांगितले.