शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अब्जाधीश पित्याचा मुलगा शिकतोय दुकानदारी

By admin | Updated: July 23, 2016 05:38 IST

सहा हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असूनही त्यांनी आपल्या तरुण मुलाला सामान्य काम करण्यासाठी केरळात पाठविले आहे.

कोची : ते गुजरातमधील सूरत येथील हिऱ्याचे व्यापारी आहेत. सहा हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असूनही त्यांनी आपल्या तरुण मुलाला सामान्य काम करण्यासाठी केरळात पाठविले आहे. यामागचा उद्देश एवढाच आहे की, मुलाला दुकानदारी समजावी. गरीब लोक नोकरी आणि पैशांसाठी कसा संघर्ष करतात ते त्याला समजावे हाच यामागचा हेतू असल्याचे सावजी ढोलकिया सांगतात. हरे कृष्ण डायमंड एक्सपोर्ट या कंपनीची व्याप्ती ७१ देशांत आहे. सावजी यांचा मुलगा द्रव्या (२१) याने अमेरिकेतून एमबीए केले आहे. २१ जून रोजी द्रव्या हा केरळला रवाना झाला. त्याला खर्चासाठी वडिलांनी सात हजार रुपये दिले आणि अगदी गरज भासल्यासच ते पैसे खर्च करायचे सांगितले. याबाबत बोलताना सुरतमधील सावजी ढोलकिया म्हणाले की, माझ्या मुलाला मी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पैसे मिळविण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, एका ठिकाणी आठवड्यापेक्षा अधिक काळ काम करायचे नाही. आपल्या वडिलांची ओळख कुठे सांगायची नाही. मोबाईलचा वापर करायचा नाही. अनुभवाशिवाय कुठल्याही विद्यापीठात हे शिकायला मिळणार नाही. द्रव्याला नोकरीचे आलेले अनुभव त्याने सांगितले. या ठिकाणी त्याला कोणी ओळखत नव्हते. भाषेची अडचण होती. तब्बल ६० ठिकाणी त्याला रिजेक्ट करण्यात आले. नोकरी नाकारणे काय असते? आणि नोकरीची किंमत काय आहे? हे आपल्याला या काळात समजल्याचे त्याने सांगितले. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना अशा अनुभवांची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)>खाचखळगे अन् ठेचा...दोन दिवसांपूर्वीच घरी परतलेला द्रव्या आपल्या अनुभवाबाबत सांगतो की, आपण कॉल सेंटर, शूज शॉप आणि मॅकडोनाल्डच्या शॉपमध्येही काम केले. महिनाभरात चार हजारांची कमाई केली. येथे ४० रुपयांना मिळणाऱ्या जेवणास मी संघर्ष केला. तर लॉजवर राहण्यासाठी मला प्रति दिवस २५० रुपये लागत होते. एकूणच काय तर पैशांबाबत कधी फारसा विचार न करणारा द्रव्यासारखा तरूण या ठेचा खाउन खूप काही शिकला आहे.