नवी दिल्ली, दि. 6 - इंटरनेटवरुन होणारा चाइल्ड पॉर्नोग्राफीचा प्रचार आणि प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही भारतात चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणा-यांची संख्या मोठी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफीमध्ये भारत मोठे योगदान देत आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफीचा मोठा ग्राहकवर्ग भारतात आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
भारतात दर 40 मिनिटाला चाइल्ड पॉर्नोग्राफीचा एक व्हिडीओ तयार होतो. इंटरनेटवर चाइल्ड पॉर्नोग्राफीचा कंटेट अपलोड करण्यामध्ये केरळ पहिल्या स्थानावर आहे तर, असा कंटेट मोबाईलवर पाहणा-या राज्यांमध्ये हरयाणा पहिल्या स्थानावर आहे.
भारतात इंटरनेटवर पॉर्नशी संबंधित जो एकूण कंटेट अपलोड होतो त्यातील 35 ते 38 टक्के पॉर्न लहान मुले आणि किशोरवयीन मुला-मुलींशी संबंधित असते. स्कूल गर्ल, टीन्स आणि देसी गर्ल्स या शब्दांवरुन गुगलवर सर्वाधिक चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित कंटेट सर्च केले जाते. भारतात दररोज पॉर्नशी संबंधित 35 ते 40 टक्क कंटेट डाऊनलोड केला जातो अशी माहिती सायबर सुरक्षा तज्ञांनी दिली.
भारतात चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या ग्राहकांची संख्या वेगाने वाढत आहे. भारतातून दररोज चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित 1,16000 प्रश्न उपस्थित केले जातात वेगवेगळया सर्च इंजिनवर प्रति सेकंद 380 जण अॅडल्ट कंटेटच्या शोधात असतात अशी माहिती सायबर तज्ञांनी दिली.
शाळेत पॉर्न वेबसाईट जॅमर बसवण्याचा केंद्राचा विचारचाईल्ड पॉर्नसंबंधी सामग्री उपलब्ध असणा-या वेबसाईट्स ब्लॉक करण्याच्या दृष्टीने शाळा परिसरात जॅमर लावू शकतो का यासंबंधी सीबीएसई बोर्डाला विचारणा केली असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. चाईल्ड पोर्नोग्राफीशी लढा देण्यासाठी आम्ही पावलं उचलत असून, अशा प्रकारची सामग्री असणा-या जवळपास 3500 हून अधिक वेबसाईट्सवर बंदी घालण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
चाइल्ड पॉर्न पाहण्यात अमृतसर नंबर 1, दिल्ली दुस-या क्रमांकावरअमेरिकेचे भाषा शास्त्रज्ञ जेम्स कर्क यांच्या अटकेनंतर त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून 30 हजारांहून अधिक चाइल्ड पॉर्नशी संबंधित फायली जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. फायलींमधील मजकुरावरून चाइल्ड पॉर्न समाजात किती खोलवर रुजले आहे हे समोर आलं आहे. इंटरनेटवर चाइल्ड सेक्सश्युल अब्यूज मटेरियल (CSAM) सर्च करण्यासाठी लहान शहरांपासून मेट्रो शहरं आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.