अहमदपूर : वृक्षतोडीमुळे समाज जीवनावर होणारा परिणाम, दुष्काळ अशा विविध समस्या युवकांनी आपल्या नाट्यातून रविवारी सादर केल्या. यात रसिक भारावून गेले होते.येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकांकिका, मूक अभिनय सादर केले. यात आरती हौसे, नीता सूर्यवंशी, राणी सोनकांबळे, रमेश हौसे, शाम होळे, नरसिंग गिरी, अमोल पडोळे, लक्ष्मीकांत गायकवाड या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. (वार्ताहर)
लोकप्रबोधनात्मक कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध
By admin | Updated: October 27, 2015 00:24 IST