शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रात्रीत थांबणार नाहीत

By admin | Updated: July 7, 2017 01:58 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय एका रात्रीत सोडविता येण्यासारखा नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले व

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय एका रात्रीत सोडविता येण्यासारखा नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले व शेतकऱ्यांच्या कल्याणसाठी सुरू केलेल्या ‘फसल बिमा योजने’सह अन्य योजनांचा प्रत्यक्ष किती फायदा होत आहे हे पाहण्यासाठी वर्षभर वाट पाहण्याची केंद्र सरकारची विनंती न्यायालयाने मान्य केली.‘सिटिझन्स रीसोर्स अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन इनिशिएटिव्ह’ (क्रांती) या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या जनहित याचिकेच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आहे. सुरुवातीस ही याचिका गुजरातमधील शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात केली गेली होती. नंतर न्यायालयाने तिची व्याप्ती वाढवून देशव्यापी केली.. सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहार व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे आली तेव्हा नवनियुक्त अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी शेतकरी आत्महत्या हा विषय गुंतागुंतीचा आहे व यास आळा घालण्यासाठी सरकारने अनेक योजना हाती घेतल्या आहेत. मात्र त्या योजनांचे प्रत्यक्ष लाभ दिसून यायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे न्यायालयाने वर्षभर वाट पाहावी, अशी त्यांनी विनंती केली.वेणुगोपाळ यांच्याशी सहमती दाखवत खंडपीठाने म्हटले की, शेतकरी आत्महत्यांचा विषय एका रात्रीत सोडविता येण्यासारखे नाही, हे खरेच आहे. त्यामुळे सरकारने हाती घेतलेल्या योजनांच्या फलनिष्पत्तीसाठी थोडी वाट पाहायला हवी, हे आम्हाला पटते. मात्र वेणुगोपाळ यांच्या विनंतीनुसार वर्षभर न थांबता न्यायालयाने ही याचिका सहा महिन्यांनंतर सुनावणीसाठी घेण्याचे निर्देश दिले.शेतकरी आत्महत्या रोखण्याचे उपाय करताना याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्सा्ल्विस यांनी या सुनावणीच्या निमित्ताने केलेल्या सूचनांचाही सरकारने विचार करावा, असेही न्यायालयाने सुचविले.फसल विमा योजनेचा लाभकेंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेल्या विविध योजनांचा संदर्भ देत वेणुगोपाळ यांनी सांगितले की, देशातील १२ कोटी शेतकऱ्यांपैकी सुमारे ५.३२ कोटी शेतकऱ्यांना ‘फसल विमा योजने’सह अन्य योजनांचे लाभ मिळत आहेत. एकूण शेतजमिनीपैकी ३० टक्के शेतजमीन पीक विमा योजनेखाली आली आहे व हा आकडा सन २०१८ अखेरपर्यंत बराच वाढण्याची आशा आहे.