शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे हाल ; विमा कंपन्या मालामाल ! (भाग १)

By admin | Updated: July 4, 2015 00:06 IST

लोकमत विशेष शेतकरी प्रतीक्षेत : कधी मिळणार विमा लाभ नागपूर : दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने केंद्र व राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच योग्य लाभ मिळाला नसून, केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्या ...


लोकमत विशेष
शेतकरी प्रतीक्षेत : कधी मिळणार विमा लाभ
नागपूर : दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने केंद्र व राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच योग्य लाभ मिळाला नसून, केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. त्यामुळे कृषी विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी की, विमा कंपन्यांसाठी असा नेहमीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार मागील वर्षी नागपूर विभागातील सुमारे १ लाख ३५ हजार ३१५ शेतकऱ्यांनी १ लाख ७८ हजार ३७७.०१ हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा काढला होता. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वांधिक म्हणजे ६२ हजार ३८६ शेतकऱ्यांचा समावेश होता तर नागपूर जिल्ह्यातील १५ हजार ७६६, वर्धा १० हजार ७४१, भंडारा १५ हजार ८६२, गोंदिया १२ हजार ७२४ व गडचिरोली जिल्ह्यातील १७ हजार ८३६ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. विशेष म्हणजे, यासाठी विमा कंपन्यांच्या खात्यात सुमारे १० कोटी ६६ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. दुसरीकडे मागील वर्षी संपूर्ण विदर्भात जोरदार अतिवृष्टी झाली होती. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे विमाधारक १ लाख ३५ हजार ३१५ शेतकऱ्यांपैकी ५२ हजार ८०२ शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना २९ कोटी ९ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र विमा कंपन्यांनी त्यापैकी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कवडी सुद्धा दिलेली नाही. गत जून महिन्यापासून खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे खत व बी-बियाण्यांची खरेदी करावी लागत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली असती, तर पीक विम्याचा खरा लाभ झाला असता. परंतु विमा कंपन्या मागील काही दिवसांपासून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कृषी व पणन विभागाचे राज्यमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विभागातील कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी पीक विम्याचा मुद्दा उपस्थित करू न, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत विमा लाभ मिळाला नसल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले.
......