शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात

By admin | Updated: March 18, 2015 23:43 IST

अवकाळी पावसामुळे देशात विविध भागांत शेती पिकांच्या नुकसानीवर राज्यसभेत बुधवारी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.

नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे देशात विविध भागांत शेती पिकांच्या नुकसानीवर राज्यसभेत बुधवारी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी सदस्यांनी यावेळी केली.शून्यप्रहरादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, जनता दल (युनायटेड)चे शरद यादव, समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव आणि काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री आदींनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात तसेच अन्य काही राज्यांत गहू आणि बागायती पिकांचे अवकाळीने प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकार एकट्याने शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही. यामुळे केंद्र सरकारने त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, असे शरद पवार म्हणाले. शरद यादव यांनी शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केला.शिवसेनेची मागणीअंदमानस्थित सेल्यूर तुरुंगात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा हटवण्यात आलेला स्मृतिफलक पुन्हा लावण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या एका सदस्याने बुधवारी लोकसभेत केली. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी हा मुद्दा उपस्थित केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)मी अंदमानच्या तुरुंगात गेलो होतो. या ठिकाणी सावरकरांच्या सन्मानार्थ एक स्मृतिफलक लावण्यात आला होता. नंतर तो हटवण्यात आला. रालोआ सरकारने तो पुन्हा लावण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप तो लावला गेलेला नाही, असे सावंत म्हणाले.४देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचा मृत्यूदिन ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न ही अत्यंत गंभीर बाब असून माजी पंतप्रधानांच्या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण कदापि होऊ देणार नाही, अशी ग्वाही बुधवारी केंद्र सरकारतर्फे संसदेत देण्यात आली.४संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (एसजीपीसी) एक कॅलेंडर प्रसिद्ध केले असून यात इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचा उल्लेख शहीद असा केला. याप्रकरणी सरकारने उत्तर देण्याची मागणी या सदस्यांनी केली.अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी वाढणार?४गरज भासल्यास संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवस वाढविण्याचा विचार सरकारने चालवला आहे. कोळसा, खाण व खनन ही दोन महत्त्वपूर्ण सुधारणाविषयक विधेयके पारित करण्यासाठी येत्या २३ आणि २४ मार्चलाही संसदेची बैठक होण्याची शक्यता आहे.

मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना डिवचणारे वादग्रस्त वक्तव्य करणारे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी बुधवारी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. स्मृती इराणींचा मी आदर करतो, असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.गत आठवड्यात राज्यसभेतील एका चर्चेदरम्यान यादव यांनी दाक्षिणात्य महिलांच्या वर्णावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.मला आदरच...मी दिलगिरी व्यक्त करतो. मला स्मृती इराणींबद्दल आदरच आहे. यापूर्वी इराणींच्या शैक्षणिक पात्रतेबाबतचा वाद झाला होता, त्यावेळी त्यांचा बचाव करणारा मी पहिला व्यक्ती होतो, असे यादव म्हणाले.