शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

नायगाव : दिवसागणीक कांद्याच्या भावात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांद्याबरोबर सर्वच शेतीमालांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

नायगाव : दिवसागणीक कांद्याच्या भावात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांद्याबरोबर सर्वच शेतीमालांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.
बाजारात सध्या कोबी, फ्लॉवर, टमाटे आदिंसह सर्वच भाजीपाला मातीमोल भावाने विकण्याची प्रसंगी फेकून देण्याची वेळ बळीराजावर येत आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वच शेतीमालास उत्पादन खर्चही हाती पडण्याइतका दर कोणत्याच पिकातून येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या सर्वच पिकांमध्ये शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न मिळवून देणार्‍या कांद्याच्या दरातही चांगलीच घसरण सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करुन प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या कांद्याला सध्या बाजारात ३५० ते ४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. या भावाने शेतकर्‍यांनी पिकाच्या उत्पादनावर केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कधी ग्राहकांच्या तर कधी उत्पादकांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या कांद्याचा विषय कायमच चर्चिला जातो. मात्र, अनेकदा कमी बाजार भावामुळे शेतकर्‍यांचा रास्ता रोको होवूनही शासन याकडे गांभिर्याने बघत नाही. कधीतरी कांदा भावात सुधारणा झालीत तर सर्व प्रसार माध्यमांद्वारे ग्राहकांच्या डोळ्यातून कांद्याचे काढलेले पाणी दाखवले जाते व शासनही अशावेळी तात्काळ याची दखल घेवून बाजारभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखते. कोणतेही शासन कधीच शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेत नसल्याचा आजपर्यंतचा उत्पादकांचा अनुभव आहे. सध्या सर्वच शेतीमालास बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे शेतकरी वर्गात मोठी कोंडी निर्माण झाली आहे. (वार्ताहर) (जोड)(1)