पीक कर्जाच्या विलंबाने शेतकरी अडचणीत शेतकर्यांचा आरोप : जिल्हा बँकेकडून सचिवांकडून याद्यांची प्रतीक्षा
By admin | Updated: April 8, 2016 00:03 IST
जळगाव : राज्यातील खरीप व रब्बी हंगामामध्ये ५० टक्के पेक्षा कमी हंगामी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दृष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत शासनाने आदेश दिले असताना जिल्हा बँकेकडून विविध कार्यकारी सोसायटीला कोणत्याही सूचना नसल्याने पीककर्जाच्या वाटपाला विलंब होत असल्याच्या तक्रारी कृउबाचे माजी संचालक शरद लाठी यांनी केली आहे.
पीक कर्जाच्या विलंबाने शेतकरी अडचणीत शेतकर्यांचा आरोप : जिल्हा बँकेकडून सचिवांकडून याद्यांची प्रतीक्षा
जळगाव : राज्यातील खरीप व रब्बी हंगामामध्ये ५० टक्के पेक्षा कमी हंगामी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दृष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत शासनाने आदेश दिले असताना जिल्हा बँकेकडून विविध कार्यकारी सोसायटीला कोणत्याही सूचना नसल्याने पीककर्जाच्या वाटपाला विलंब होत असल्याच्या तक्रारी कृउबाचे माजी संचालक शरद लाठी यांनी केली आहे.३१ मार्च रोजी शेतकर्यांनी कर्जाची परतफेड केल्यानंतर जिल्हा बँकेतर्फे विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्फत १ एप्रिलपासून पीक कर्जाच्या वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत असते. मात्र यावर्षी आठवडा उलटला असला तरी पीककर्जाच्या वाटपबाबत तसेच कर्जाच्या पुर्नगठनाबाबत जिल्हा बँकेकडून कोणतीही सूचना विविध कार्यकारी सोसायट्यांना पाठविण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा बँकेला याद्यांची प्रतीक्षा३१ मार्चपर्यंत कर्जवसुली झाल्यानंतर जिल्हा बँकेकडून व्याज परताव्याच्या दोन व अडीच टक्क्यांच्या शासन परताव्याच्या याद्या सचिवांकडून मागविण्यात आल्या आहेत. तसेच कर्जदार शेतकर्यांची विविध कार्यकारी सोसायटी व जिल्हा बँक शाखा या दोघांची खातेबाकी जुळविण्याची सूचना बँकेतर्फे गटसचिवांना देण्यात आली आल्याचे जिल्हा बँक सूत्रांनी सांगितले. कोटजिल्हा बँकेतर्फे मागेल त्या शेतकर्याला पीक कर्ज देण्यात येणार आहे. काही ठिकाणी पीक कर्जाच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. उर्वरित ठिकाणी लवकरच पीककर्ज वाटप होणार आहे. ज्या जमिनीवर जो पिकपेरा आहे त्यावर कर्ज देण्यात येणार आहे. त्यातच विकासो व जिल्हा बँक शाखा यांचे खाते जुळविण्याची सूचना सचिवांना देण्यात आली आहे.-जितेंद्र देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा बँक, जळगाव. ६२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा पीक कर्ज वितरणाबाबत दाखला मिळालेला नाही. ४० वर्षांपासून आपण पीक कर्जाची नियमित फेड करीत आहोत. कर्ज मिळत नसल्यास काय करावे.-शरद लाठी, जळगाव.यावर्षी जिल्हा बँकेने शेतातील पिकाचे क्षेत्र पाहून कर्ज वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकर्यांना कमी कर्ज मिळणार आहे. एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. मात्र अद्याप कर्ज वितरणाबाबत आदेश नाहीत.-सुधाकर सूर्यवंशी, चेअरमन, आमोदे बुद्रुक, ता.जळगाव.