शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन योजनेसाठी शेतकऱ्यांनाही द्यावे लागेल अंशदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 04:37 IST

जे शेतकरी पेन्शन योजनेसाठी बँकेत अर्ज करतील, त्यांनाच केंद्र सरकार वृद्धावस्था पेन्शन योजनेचा लाभ देणार आहे.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : जे शेतकरी पेन्शन योजनेसाठी बँकेत अर्ज करतील, त्यांनाच केंद्र सरकार वृद्धावस्था पेन्शन योजनेचा लाभ देणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या योजनेबाबत सांगितले की, ही योजना ऐच्छिक असून शेतकऱ्यांनाही त्यासाठी अंशदान द्यावे लागणार आहे.मोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळात पेन्शन योजनेबाबत असे मानले जात आहे की, ज्या शेतकºयांचे वय ६० वर्षे आहे त्यांच्या खात्यात सरकार महिन्याला तीन हजार रुपये टाकणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकºयांना अर्ज करावा लागेल.यासाठी बँकेत खाते सुरू करावे लागेल. तसेच, त्या खात्यात ठराविक रक्कम जमा करावी लागेल. केंद्र सरकारही शेतकºयांच्या रकमेएवढी रक्कम पेन्शन योजनेत जमा करेल. ज्या शेतकºयांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.>काय आहे नेमकी योजना?केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, ही योजना छोट्या शेतकºयांना सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. कारण, वृद्धावस्थेत या शेतकºयांकडे कोणतीही बचत असत नाही. त्यामुळे आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागते. योजनेनुसार शेतकºयाचे वय ६० वर्षे झाल्यानंतर दर महिन्याला किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ही ऐच्छिक आणि अंशदान आधारित आहे. यात नोंदणीकृत शेतकरी आणि केंद्र सरकारचा हिस्सा समान असेल.