शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील शेतकरी नेते ‘बुढा’ गावात

By admin | Updated: July 5, 2017 20:22 IST

शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चावर दीडपट दाम मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे उद्या ६ जुलै

- रमाकांत पाटील/ ऑनलाइन लोकमत

बुढा (मध्यप्रदेश), दि. 05 -  शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चावर दीडपट दाम मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे उद्या ६ जुलै पासून मध्यप्रदेशातील मंदसौर ते दिल्ली अशी किसान मुक्ती यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील शेतकरी नेते बुढा गावात एकत्र झाले आहे. गेल्या महिनाभरापासून देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विविध ठिकाणी संतापाचे वातावरण आहे. विशेषत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संप आणि मध्यप्रदेशातील पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेला गोळीबार या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र येवून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना केली आहे. या समितीतर्फे ६ ते १८ जुलै या दरम्यान मंदसौर ते दिल्ली किसान मुक्ती यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी पूर्वसंध्येला या सर्व शेतकरी संघटनांचे नेते बुढा या गावात मुक्कामी आले आहे. यात महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे मुख्य संयोजक व्ही.एम.सिंग, आॅल इंडिया किसान सभेचे हन्नान मौला, जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक माजी आमदार सुनिलम्, जय किसान आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांच्यासह विविध संघटनांचा नेत्यांचा समावेश आहे.- या यात्रेच्या पूर्वसंध्येलाच मध्यप्रदेशातील मुख्य शेतकरी नेते सुनिलम् यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.श्रद्धांजली सभेला परवानगी नाकारली...- गेल्या महिन्यात मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर मध्यप्रदेश पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर किसान मुक्ती यात्रेची सुुरुवात मंदसौरपासून होत आहे. सुरुवातीला बही चौपाटीवर ६ जुलैला सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा होणार होती. त्यास मध्यप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली असून सर्वत्र चोख बंदोबस्त आहे. दरम्यान सरकारचा विरोध असला तरी श्रद्धांजली सभा होणारच असा निर्धार शेतकरी नेत्यांनी घेतला आहे.