शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफी उत्तर प्रदेशपुरतीच

By admin | Updated: March 19, 2017 00:21 IST

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने देण्यात आलेले शेतकरी कर्जमाफी योजनेचे वचन हे राष्ट्रीय धोरण नसून, त्या राज्यापुरतेच मर्यादित होते, असे स्पष्टीकरण

हैदराबाद : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने देण्यात आलेले शेतकरी कर्जमाफी योजनेचे वचन हे राष्ट्रीय धोरण नसून, त्या राज्यापुरतेच मर्यादित होते, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून सरकारला लोकसभेत घेरण्याची तयारी विरोधकांनी चालविली असताना नायडू यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यात येईल, अशी घोषणा भाजपने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत दिले होते. तेथे सरकार स्थापन झाल्यानंतर या घोषणेच्या अंमलबजावणीवर सकारात्मक विचार केला जाईल. ही घोषणा उत्तर प्रदेशपुरतीच मर्यादित होती. हे सरकारचे राष्ट्रीय धोरण नाही.लोकसभेतील एका चर्चेत विरोधी पक्ष सदस्यांनी सरसकट सर्व देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. केवळ उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला त्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्या थांबविण्यासाठी संपूर्ण देशात कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती.केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, कर्जमाफी ही राज्याच्या वित्तीय स्थितीवर अवलंबून आहे. प्रत्येक राज्य याबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. (वृत्तसंस्था)दक्षिणेकडील राज्यांबाबत भेदभावप्रसिद्ध तेलुगू अभिनेते आणि जन सेनेचे संस्थापक पवन कल्याण यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला होता. सरकार उत्तरेतील राज्ये आणि दक्षिणेतील राज्ये यांच्यात भेदभाव करीत असून, उत्तरेतील राज्यांना झुकते माप देत आहे, असे पवन कल्याण यांनी म्हटले होते. पवन कल्याण यांचा थेट उल्लेख न करता, नायडू यांनी सरकारची भूमिका मांडली.