शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

संजय राऊत यांच्यावर फेकली शाई

By admin | Updated: October 5, 2016 04:58 IST

शिवसेनेचे खासदार व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर मंगळवारी लखनौमध्ये शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लखनऊ : शिवसेनेचे खासदार व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर मंगळवारी लखनौमध्ये शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेनेच्या नेत्यावर शाई फेकण्याचा हा पहिलाच प्रकार असून, तो उत्तर प्रदेशात घडला हे विशेष. शिवसेनेने लखनौमध्ये आयोजित केलेल्या रॅलीत हा प्रकार घडला. मात्र आपणावर शाई का फेकण्यात आली, हे मला समजू शकले नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र संजय राऊत यांच्या सतर्कतेमुळे शाई त्यांच्या अंगावर न पडता रस्त्यावर पडली. राऊत यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.शिवसेनेच्या कार्यकर्त्याने शाई फेकल्यानं राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शिवसैनिकानेच संजय राऊत यांच्यावर शाई का फेकली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार शिवसैनिकांच्या दोन गटांतील वादांतून हा प्रकार घडला असावा. संजय राऊत म्हणाले, माझ्यावर शिवसैनिकानेच शाई का फेकली याचा मी शोध घेत आहे. मी स्वत:च या प्रकरणात लक्ष घालत आहे. (वृत्तसंस्था)