शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक-व्हॉट्सअॅपचा असाही फायदा

By admin | Updated: June 1, 2017 16:58 IST

सोशल नेटवर्किंग साइट्स सध्या व्यवसायाचं माध्यम म्हणून लोकांच्या फायद्याचं ठरतं आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून आज गृहिणी चांगली कमाई करत आहेत.

लोकमत ऑनलाइन

अहमदाबाद, दि. 1- ­­­फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्यात तासनतास घालवले जातात अशी ओरड नेहमीच ऐकु येत असते. पण चॅटिंग किंवा फोटो शेअरिंगच्या पलिकडे जाऊन इतरही गोष्टी सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर केल्या जातात. सोशल नेटवर्किंग साइट्स सध्या व्यवसायाचं माध्यम म्हणून लोकांच्या फायद्याचं ठरतं आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून आज गृहिणी चांगली कमाई करत आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे झारखंडमधील बोकारो शहरातील पूजा सिंह ही गृहिणी.
दहा वर्षापेक्षा जास्त काळ हैदराबादमध्ये राहिलेली पूजा लग्नानंतर झारखंडमधील बोकारो शहरात स्थायिक झाली होती. लग्नापूर्वी पूजा हैदराबादमध्ये तिचं कपड्यांचं दुकान चालवत होती. पण लग्नानंतर तिला दुकान बंद करावं लागलं. झारखंडमध्ये आल्यावर नवं दुकान सुरू करू असा निर्णय तीने घेतला होता पण तिथे गेल्यावर दुसरं दुकान सुरू करणं पूजाला शक्य झालं नाही. तरी  पूजाने आपली व्यवसायाची आवड जोपासण्यासाठी ऑनलाइन मार्केटिंगचा आधार घेतला. व्हॉट्स अॅप हे चॅटिंग अॅपलिकेशन आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून पूजाने कपड्यांची विक्री करायला सुरुवात केली. हळूहळू पूजाचा कपड्यांचा व्यवसाय वाढतो आहे. दर महिन्याला ती ७०-८० ड्रेसे विकते आहे.  झारखंडमध्येच ७० टक्के ग्राहक तीला मिळाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पूजाला   व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून दुसऱ्या राज्यातील ग्राहकांच्याही ऑर्डर्स मिळू लागल्या आहेत. पूजाच्या या व्यवसायाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ती आता कपड्यांव्यतिरिक्त इतर उत्पादनंही ऑनलाइन पद्धतीने विकण्याचा विचार करत आहे.
पूजाप्रमाणेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जयपूरच्या निधी जैन या गृहिणीनेसुद्धा आपला रिटेल व्यवसाय सुरू केला आहे. "सुरुवातीला मी पुनर्विक्रीसाठी दुसऱ्या पुरवठादारांच्या छोट्या छोट्या ऑर्डर्स स्वीकारत होती. सोशल मीडियामुळे हळूहळू माझं नेटवर्क वाढल्याने आता चांगली विक्री होत आहे. असं निधीने सांगितलं आहे. निधी व्हॉट्स अॅपचा वापर पेमेंट्स आणि लॉजिस्टिक्ससाठी करते, तर मालाच्या विक्रीसाठी आणि ग्राहक वाढविण्यासाठी फेसबुकचाच चांगला उपयोग होतो, असं तिचं मत आहे.