शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

फेसबुकनं उघडलं 'लोकल मार्केट', सामान खरेदी-विक्री करण्याची सुविधा

By admin | Updated: October 4, 2016 18:36 IST

सोशल मीडियावरची आघाडीची कंपनी फेसबुकनंही ऑनलाइन 'मार्केटप्लेस' ही सुविधा सुरू केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4- सोशल मीडियावरची आघाडीची कंपनी फेसबुकनंही ऑनलाइन 'मार्केटप्लेस' ही सुविधा सुरू केली आहे. मार्केटप्लेसच्या माध्यमातून तुम्हाला कोणतंही सामान खरेदी अथवा विक्री करता येणार आहे. प्लिप कार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी फेसबुकनं ही सुविधा उपलब्ध करून दिल्याची आता चर्चा आहे.

फेसबुकनं एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मार्केटप्लेस'मुळे फेसबुकच्या युजर्सना खरेदी-विक्री करणं सोपं जाणार आहे. मार्केटप्लेस ही सुविधा लवकरच अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांमधल्या अ‍ॅपल आणि अँड्रॉइड मोबाईल धारकांसाठी उपलब्ध करून देण्याचा फेसबुकचा विचार आहे. फेसबुकच्या माहितीनुसार, 45 कोटी लोक प्रत्येक महिन्याला फेसबुकला भेट देत असून, 'मार्केटप्लेस'द्वारे वस्तू खरेदी आणि विक्रीही करतात.

फेसबुकवर मार्केट प्लेसच्या आयकॉनला क्लिक केल्यावर ई-कॉमर्स साइटवर विकल्या जाणा-या सर्व वस्तू पाहायला मिळतात. यूजर्सला जी वस्तू विकायची आहे त्याला तो टॅब करेल, या वस्तूचा फोटो आणि डिस्क्रिप्शन टाकल्यानंतर ती वस्तू मार्केटप्लेसमध्ये ग्राहक विकू शकतो, अशी सुविधा फेसबुककडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.