शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बिलोली पालिका सीसीटीव्हीच्या नजरेत

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

सव्वाकोटींच्या कामांचा २६ ला निर्णय

सव्वाकोटींच्या कामांचा २६ ला निर्णय
बिलोली : येथील नगरपालिका पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेत आली आहे़ सभागृह, कर्मचारी कक्ष, मुख्याधिकारी कक्ष आणि कम्पाऊंड परिसात कॅमेरे बसवण्यात आले आहेत़ परिणामी अधिकारी व कर्मचार्‍यांशी अनावश्यक हुज्जत घालणार्‍यांवर लगाम बसणार आहे़ दरम्यान २६ जून रोजी सव्वाकोटींच्या विकासकामांसह अन्य १५ विषयांवर पालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे़
येथील नगरपालिका या ना त्या कारणामुळे चर्चेत राहत आली आहे़ विकासकामांच्या बाबतीत तर नेहमीच घोळचघोळ होत आलेला आहे़ दीड वर्षापूर्वी कामे न करताच उचललेल्या ५० लाखांचे प्रकरण जिल्‘ात गाजले़ तत्पूर्वी निविदा कुठे ठेवल्या यावरूनही वादंग झाले होते़ तर कर्मचार्‍यांकडून कामाची संचिकाच हिसकावून गायब केल्याचा प्रकार झाला़ फाईल गहाळ प्रकरणामुळे पोलिसात गुन्हा दाखल झाला़ सध्या सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे़ पालिका सभागृह, परिसर, कर्मचार्‍यांच्या वेगवेगळ्या कक्षात होणारा प्रकार पाहता आता संपूर्ण कार्यालय आणि परिसर सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्यात आला़ महिनाभरापूर्वी एका नगरसेवकाचा व मुख्याधिकार्‍यांत तू-तू-मै-मै व अरेरावीच्या भाषेचा प्रकार घडला़ परिणामी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यात दहशतीचे वातावरण झाले़ बर्‍याचवेळा महिला नगरसेविकांचेच प्रतिनिधी हस्तक्षेप करतात आणि अधिकारी कर्मचा्रयांना नाकीनऊ आणतात़ अशा कॅमेरामुळे सर्वच प्रकारावर ब्रेक बसला आहे़ कार्यालयीन कामकाजाच्या वेळातील सर्व रेकॉर्डींग केले जात आहे़ अशा रेकॉडींगमुळे सबळ पुरावे समोर येतील व वास्तव काय आहे हे सर्वांनाच कळेल़
पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रस्तावित रकमेच्या कमी दराने निविदा आलेल्या आहेत़ शहरातील सव्वा कोटींच्या कामाच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या़ यापूर्वी याच निविदा ठेकेदारांच्या अंतर्गत भांडणामुळे आणि वाढीव दराने असल्याने स्थायी निर्देश ३६ चे उल्लंघन झाल्याचे सांगून रद्द करण्यात आल्या़ आता हीच कामे पुन्हा वेगवेगळ्या ठेकेदारांनी स्पर्धात्मक निविदेच्या माध्यमातून सादर केली असून प्रस्थापित रकमेच्या १५ ते २२ टक्क्यापर्यंत (बिलो) कमी दराने आहेत़ विकास कामाअंतर्गत कोळी समाज स्मशानभूमीच्या महत्त्वाचा कामाचा भाग आहे़ २६ जून रोजी या प्रमुख विषयांसह अन्य १५ विषयावर सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली़ पालिकेची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच ईन कॅमेरा होणार आहे़