शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्याचे गोव्यात प्रशिक्षण

By admin | Updated: September 6, 2015 23:54 IST

-बंगळूरला कोठडीत दिली कबुली-आयएमचा खतरनाक अतिरेकी-सईद अफाक पाच दिवस गोव्यात- गोव्यासह सर्वच सुरक्षा यंत्रणा अंधारात पणजी : गोव्यात अतिरेकी येऊन लपल्याचे आतापर्यंत उघडकीस आले होते; परंतु इंडियन मुजाहिद्दीनचा (आयएम) खतरनाक अतिरेकी सईद इस्माईल अफाक हा तर गोव्यात येऊन पॅराग्लायडिंगचे पाच दिवस प्रशिक्षणही घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या अतिरेक्याच्या कोठडीतील ...


-बंगळूरला कोठडीत दिली कबुली
-आयएमचा खतरनाक अतिरेकी
-सईद अफाक पाच दिवस गोव्यात
- गोव्यासह सर्वच सुरक्षा यंत्रणा अंधारात

पणजी : गोव्यात अतिरेकी येऊन लपल्याचे आतापर्यंत उघडकीस आले होते; परंतु इंडियन मुजाहिद्दीनचा (आयएम) खतरनाक अतिरेकी सईद इस्माईल अफाक हा तर गोव्यात येऊन पॅराग्लायडिंगचे पाच दिवस प्रशिक्षणही घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या अतिरेक्याच्या कोठडीतील तपासादरम्यान ही माहिती उघड झाली. अफाकला 8 जानेवारी 2015 रोजी बंगळुरू येथे अटक केले होते. तो राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत सध्या बंगळूरमध्येच आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अफाकची कोठडीत चौकशी केली होती तेव्हा त्याने अनेक महत्वाच्या गोष्टींची कबुली दिली. त्यात त्याने गोव्यात येऊन पॅराग्लायडिंग प्रशिक्षण घेतल्याचेही सांगितले आहे. बंगळुरू येथील एका प्रशिक्षकाकडून त्याने पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतले, असे त्याने सांगितल्याचा उल्लेख एनआयएच्या आरोपपत्रात आहे. गोव्यात पॅराग्लायडिंग नोव्हेंबरच्या सुमारास होते. बंगळुरूमधील केवळ एकमेव प्रशिक्षक गोव्यात येतो व त्याचे नाव नरेंद्र रमण असे आहे. हरमल व किनारी भागात तो पॅराग्लायडिंग शिकवतो. केरी येथे एका भाड्याच्या खोलीत तो राहात होता.
गोव्यात पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अफाकने अमेरिकेतून दोन पॅराग्लायडिंगची सेकंड हँड किट्सही खरेदी केली होती; परंतु त्यानंतर त्याने गोव्यात पुन्हा पॅराग्लायडिंग केले की नाही याबद्दल काही माहिती एनआयएला मिळाली नाही. खतरनाक अतिरेकी त्रिकुटापैकी जानेवारीत अफाक आणि अब्दस सबुर (24) यांना बंगळुरू येथे अटक केली होती तर सद्दाम हुसैन (35) याला भटकळमध्ये अटक केली होती. त्यानंतर एनआयएकडून त्याची चौकशी सुरू केल्यानंतर या त्रिकुटापैकी अफाकच्या गोव्यातील वास्तव्याबद्दल माहिती उघड झाली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पॅराग्लायडर्सवरही नजर ठेवण्याच्या सूचना राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांकडून दिल्या आहेत. गोव्यात अतिरेकी येऊन पाच दिवस प्रशिक्षण घेऊन गेल्याचा सुगावा गोव्यातील पोलीस यंत्रणेला तर लागला नव्हताच; परंतु या अतिरेक्याने स्वत: कबुली देण्यापूर्वी एनआयएलाही लागला नव्हता. एवढेच नव्हे तर पॅराग्लायडिंग प्रशिक्षकालाही त्याची कल्पना नव्हती, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.


(बॉक्स)
एकट्यास प्रशिक्षण द्या
अफाकच्या प्रशिक्षकाची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अफाक हा आपल्याला एकट्यालाच स्वतंत्र प्रशिक्षण देण्यास सांगत होता. त्या पॅराग्लायडिंग व्यतिरिक्त टँडेम पॅराग्लायडिंगमध्येही त्याला रस होता. याशिवाय भटकळ भागात पॅराग्लायडिंग शक्य आहे का, याची माहितीही तो घेण्याचा प्रयत्न करीत होता.