शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण सोपे नाही

By admin | Updated: June 14, 2017 03:51 IST

किंगफिशर एअरलाइन्स या आता बंद पडलेल्या विमान कंपनीच्या नावे बँकांकडून घेतलेली ९,००० कोटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेले वादग्रस्त

- लोकमत न्यूज नेटवर्क

लंडन/नवी दिल्ली : किंगफिशर एअरलाइन्स या आता बंद पडलेल्या विमान कंपनीच्या नावे बँकांकडून घेतलेली ९,००० कोटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेले वादग्रस्त ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठीच्या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी लंडनमधील न्यायालयात ६ जुलैपर्यंत तहकूब झाली. भारत सरकारने हे प्रत्यार्पण सोपे नसल्याचे म्हटले आहे.प्रत्यार्पणाचे प्रकरण सुनावणीस येण्याआधी, मल्ल्यांना भारतात केव्हा आणणार, असे विचारले असता परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी सांगितले की, (हे) प्रत्यार्पण सोपे नाही ईडीकडे असलेली कागदपत्रे ब्रिटनला पाठविली आहेत. त्यांच्या कायद्यानुसार प्रत्यार्पण मंजूर होताच मल्ल्याला परत आणले जाईल.मध्य लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात कोर्ट रूम क्र. ३ मध्ये चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा लाऊझी आॅर्बथनॉट यांच्यापुढे मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण आले. यात मंगळवारी फार काही होणे अपेक्षितही नव्हते कारण ते ‘केस मॅनेजमेंट’ या शीर्षकाखली होते. त्यामुळे मॅजिस्ट्रेटनी उभय पक्षांकडून दाखल झालेल्या दस्तावेजांचा आढावा घेतला आणि भारत सरकारकडून आणखी काही पुरावे सादर होणे अपेक्षित असल्याचे म्हणून ६ जुलै ही पुढील तारीख दिली. आणखी दोन तीन तारखा अशाच प्राथमिक तयारीत जातील व त्यानंतर सविस्तर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरविली जाईल, असे दिसते. त्यामुळे मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाच्या बाबतीत पुढील महिना दीड महिना तरी फारसे काही भरीव होण्याची अपेक्षा नाही.स्वत: विजय मल्ल्या आपल्या वकिलांसह या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहिले. एप्रिलमध्ये त्यांना औपचारिक अटक करून लगेच जामिनावर सोडण्यात आले होते. प्रत्यार्पण प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी ‘ईडी’ आणि केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांची एक तुकडीही ब्रिटनला गेली आहे. तेथे भारत सरकारच्या वतीने ‘क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस’चे प्रॉसिक्युटर काम पाहात आहेत. भारतातून गेलेली अधिकाऱ्यांची तुकडी या प्रॉसिक्युटरना भेटून वेळोवेळी ताजी माहिती व कागदपत्रे सुपूर्द करत आहे.