सीबीआयवर दबाव : मोदींनी दिले होते चौकशीचे आदेशहरीश गुप्ता - नवी दिल्लीशारदा घोटाळ्यातील आरोपी आणि काँग्रेस नेते मतंग सिंह यांची अटक टाळण्यासाठी सीबीआयवर कथितरीत्या दबाव आणल्याच्या मुद्यावरून केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांची बुधवारी रात्री केंद्र सरकारने तडकाफडकी हकालपट्टी केली. गोस्वामी यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना दिल्यानंतरच्या वेगवान घडामोडींची अखेर गोस्वामींच्या गच्छंतीने झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवमानजनक रीतीने हकालपट्टी करण्यात आलेले गोस्वामी हे पहिलेच गृहसचिव आहेत. मोदींच्या सूचनेबरहुकूम राजनाथ यांनी गृहसचिवांना बुधवारी पाचारण केले़ गोस्वामी यांनी या प्रकरणात खरेच हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न केले का आणि असे असेल तर यामागचे कारण काय, हे राजनाथ यांनी यावेळी जाणून घेतल्याचे कळते़ गोस्वामींशी चर्चा केल्यानंतर राजनाथ यांनी तात्काळ सीबीआयप्रमुख अनिल सिन्हा यांची भेट घेतली़ सीबीआय प्रमुखांनी यावेळी मतंग सिंह यांच्या अटकेपूर्वीचा घटनाक्रम त्यांच्यासमक्ष कथन केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यानंतर पुढे काय होणार, याविषयीची उत्कंठा दिवसभर कायम होती. गोस्वामी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता सायंकाळी उशिरा व्यक्त होऊलागली आणि रात्री त्यांच्या हकालपट्टीचे वृत्त थडकलेच. सूत्रांच्या मते, संपुआ- २ च्या कार्यकाळात गोस्वामी यांची केंद्रीय गृहसचिवपदी वर्णी लावण्यात मतंग सिंह यांनी मोठी भूमिका बजावली होती़ मतंग सिंह हे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे निकटस्थ मानले जातात़ पदभार स्वीकारल्यानंतर मोदींनी नोकरशाहीत फारसे बदल न करता संपुआ सरकारने केलेल्या नियुक्त्या कायम ठेवल्या होत्या़ मात्र अलीकडे सरकारने डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदेर, परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांची कार्यकाळ संपण्यापूर्वीच हकालपट्टी केली़ गोस्वामी यांचीही तिच गत करण्यात आली. यापूर्वीही अडकले संशयाच्या फेऱ्यातच्गोस्वामी यापूर्वीही संशयाच्या फेऱ्यात अडकलेले आहेत़ गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या़ टी़एस़ ठाकूर यांनी गोस्वामी यांच्या पत्नीला उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासंदर्भात राष्ट्रपतींना एक अहवाल पाठविला होता़ च्गोस्वामींच्या पत्नी जम्मू-काश्मिरात जिल्हा न्यायाधीश आहेत आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी उत्सुक आहेत़ अनिल गोस्वामी हे गृहमंत्रालयाव्यतिरिक्त न्याय विभागाचेही सचिव आहेत़ येत्या जुलैमध्ये त्यांचा विस्तारित कार्यकाळ संपणार होता.च्शारदा चिटफंड घोटाळ्यात कथित सहभाग असल्याच्या आरोपाखाली गेल्या शनिवारी सीबीआयने मतंग सिंह यांना अटक केली होती़ मतंग सिंह यांच्या अटकेबाबत सरकारमधील काही अधिकाऱ्यांचा आपल्यावर दबाव असल्याचे सीबीआयने कोलकात्याच्या एका स्थानिक न्यायालयात सांगितल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर आले होते़ च्मतंग सिंह यांची अटक लांबल्यामुळे प्रकरणाच्या चौकशीला विलंब झाल्याचेही सीबीआयने न्यायालयासमक्ष स्पष्ट केले होते़ सीबीआयवर दबाव टाकणाऱ्या या अधिकाऱ्यांत प्रामुख्याने कथितरीत्या अनिल गोस्वामींचे नाव समोर आले आहे़ सीबीआयच्या यासंदर्भातील अहवालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेतग़ोस्वामी यांनी कथितरीत्या या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता, असे कळते़
केंद्रीय गृहसचिवांची अखेर हकालपट्टी
By admin | Updated: February 5, 2015 02:50 IST