शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

पुणे, अहमदनगर प्रकल्पांना मुदतवाढ

By admin | Updated: May 22, 2015 01:17 IST

पुणे आणि अहमदनगरसह सात ठिकाणचा नॅशनल आॅटोमोटिव्ह टेस्टिंग अ‍ॅण्ड आर अ‍ॅण्ड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आता पुढील तीन वर्षांत मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे.

हरीश गुप्ता - नवी दिल्लीगेल्या अनेक दशकांपासून ठप्प पडलेला पुणे आणि अहमदनगरसह सात ठिकाणचा नॅशनल आॅटोमोटिव्ह टेस्टिंग अ‍ॅण्ड आर अ‍ॅण्ड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आता पुढील तीन वर्षांत मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे.विविध ठिकाणी जमिनीचे अधिग्रहण करण्यात झालेला विलंब, मंजुरी मिळविण्यात झालेला विलंब, कंत्राटविषयक अडचणी, विदेशी चलनातील परिवर्तन आणि अन्य समस्यांमुळे एनएटीआरआयपीला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले आहे. आपल्या निम्म्या क्षमतेनिशी कार्यान्वित असलेला पुण्यातील प्रकल्पांचा दर्जा वाढविणे शक्य झाले नाही. परंतु आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक कामकाज समितीने पुण्याच्या आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया येथील टेस्टिंग अ‍ॅण्ड होमोलोगेशन सुविधा आणि अहमदनगर येथील व्हेईकल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलप्मेंट एस्टॅब्लिशमेंटचा दर्जा वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पुणे व नगरसह ज्या अन्य ठिकाणी हा प्रकल्प स्थापन केला जाणार आहे, त्यात सिल्चर, रायबरेली, मानेसर, चेन्नई आणि इंदूरचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी तीन वर्षे म्हणजे ३१ डिसेंबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हा प्रकल्प शिवसेनेचे अनंत गीते यांच्या नेतृत्वातील अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.या प्रकल्पातील सुविधा१)हरियाणाच्या मानेसर येथील आॅटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या उत्तर हबमध्ये पूर्ण विकसित टेस्टिंग आणि होमोलोगेशन सेंटर.२)चेन्नईजवळील आॅटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या दक्षिण हबमध्ये पूर्ण विकसित टेस्टिंग व होमोलोगेशन सेंटर.३) पुणे येथील आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया (अराई)मधील विद्यमान टेस्टिंग आणि होमोलोगेशन सेंटर तसेच अहमदनगरच्या व्हेईकल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलप्मेंट एस्टॅब्लिशमेंटचा दर्जा वाढविणार.४) ४००० एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे प्रमाणित मैदान. ५)आसामच्या सिल्चर येथील धोलचोरा येथे राष्ट्रीय विशेष हिल ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र.