शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जेरुसलेमवरून अमेरिका संयुक्त राष्ट्रांत एकाकी, मध्य-पूर्वेत तणावाची भीती व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:13 IST

जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटू लागले असून, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये या प्रश्नावर अमेरिका एकाकी पडल्याचे दिसून आले.

संयुक्त राष्ट्रे : जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटू लागले असून, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये या प्रश्नावर अमेरिका एकाकी पडल्याचे दिसून आले. जेरुसलेमला मान्यता दिल्याने मध्य-पूर्वेत तणाव वाढू शकेल, अशी भीती अनेक राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.अमेरिकेने जेरुसलमेला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर, सुरक्षा परिषदेतील १५ पैकी ८ सदस्य राष्ट्रांनी या विषयावर तातडीच्या बैठकीची मागणी केली होती. अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभरातील शांतता बिघडण्याची भीतीही या राष्ट्रांनी व्यक्त केली होती.बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात पाच युरोपीय देशांनी म्हटले आहे की, जेरुसलेमच्या दर्जाबाब पॅलेस्टाइन व इस्रायल यांच्यातील वाटाघाटींमधूनच उपाय निघायला हवा. जेरुसलेम ही इस्रायल व पॅलेस्टाइन या दोहोंची राजधानी असल्यामुळे त्यांच्यामधील वाटाघाटींतूनच त्यावर तोडगा निघू शकेल. तसे होईपर्यंत युरोपीयन युनियन जेरुसलेमच्या सार्वभौमत्त्वाला मान्यता देऊ शकत नाही.मात्र, अमेरिकेच्या प्रतिनिधी निकी हॅले यांनी मात्र संयुक्त राष्ट्रे इस्रायलचा द्वेष करणारी एक केंद्र बनली आहेत, असा आरोप करीत अमेरिकेची बाजू जोरात मांडली. (वृत्तसंस्था)हिंसाचारात वाढ होण्याची भीतीबैठकीच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्रांचे मध्य-पूर्वेतील विशेष प्रतिनिधी निकोलाय म्लादेनोव्ह यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या कृतीमुळे भविष्यातील धोके निर्माण होतील, हिंसक घटना वाढतील, अशी भीती व्यक्त केली.

टॅग्स :United Statesअमेरिका