शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दलित अत्याचारावर स्पष्टीकरण द्या

By admin | Updated: August 12, 2016 02:55 IST

दलितांवरील अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी केली.

नवी दिल्ली : दलितांवरील अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी केली. रोहित वेमुला व उना यासारख्या प्रकरणातून भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला तडे गेले आहेत, त्याची भरपाई करण्याचा तोंडी प्रयत्न नरेंद्र मोदींकडून सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मायावती म्हणाल्या की, दलितांबाबत पंतप्रधानांनी नुकतेच केलेले वक्तव्याचा काहीही परिणाम झाला नसून, आजही देशभर दलितांवर अत्याचार होतच आहेत. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांत अशा अनेक घटना झाल्या आहेत. त्यामुळे भाजपचे खरे रूप जनतेसमोर आले आहे. दलितांबाबत केवळ तोंडी सहानुभूती दाखविण्याऐवजी पंतप्रधानांनी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कारवाईवर लक्ष केंद्रित करायला हवे. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर बाहेर बोलत असतील, तर याच विषयावर ते सभागृहातही बोलू शकतात, पण ते संसदेत बोलण्याचे जाणूनबुजून टाळत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. गेल्या आठवड्यात काय म्हणाले होते मोदी? गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले होते की, कोणाला हल्ला करायचा असेल तर तो दलितांवर नव्हे, माझ्यावर करा. कोणाला गोळ्या घालायच्या असतील तर माझ्यावर घालाव्यात. पण, गोरक्षणाच्या नावाने दलितांवर होणारे हल्ले थांबायला हवेत. गुजरातमधील उना येथे मृत गायीची कातडी कमावणाऱ्या दलितांना झालेल्या बेदत मारहाणीनंतरही तसे अनेक प्रकार घडले. त्या विषयावरील आपले मौन सोडताना मोदी म्हणाले होते की, गोरक्षणाच्या नावाखाली अनेकांनी दुकानदारी थाटली आहे. राज्य सरकारांनी त््यांची माहिती गोळा करावी आणि त्यांचे उद्योग जनतेसमोर आणावेत. जेवढ्या गायी कत्तल केल्याने मरत नाहीत, त्यापेक्षा अधिक गायी कचराकुंड्यातील प्लास्टिक खाउन मरतात, अशा गायांना वाचविले तरी ती फार मोठी गोसेवा होईल.