शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जातींच्या आकडेवारीसाठी तज्ज्ञगट

By admin | Updated: July 17, 2015 04:39 IST

जात जनगणना जारी करण्यासाठी विरोधकांनी आणलेल्या दबावासमोर झुकत केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध जातींची आकडेवारी पडताळणीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे.

नवी दिल्ली : जात जनगणना जारी करण्यासाठी विरोधकांनी आणलेल्या दबावासमोर झुकत केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध जातींची आकडेवारी पडताळणीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे. राज्य सरकारांनीच श्रेणीनिहाय विविध जातींची आकडेवारी संकलित करण्याचे काम पूर्णत्वास नेले नसल्याचा ठपकाही केंद्र सरकारने ठेवला आहे.नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या नेतृत्वातील गटाकडे ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जातगणनेच्या आकडेवारीचे वर्गीकरण झाल्यानंतर योग्यवेळी ते जाहीर केले जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना स्पष्ट केले. संपुआ सरकारने मे २०११ मध्ये घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवरच आकडेवारीची पडताळणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेससह समाजवादी पक्ष, जेडीयू, राजद आणि द्रमुकने जात गणनेवर आधारित आकडेवारी जारी न केल्याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला होता. १९१२ नंतर प्रथमच ३ जुलै २०१५ रोजी अशा प्रकारच्या जनगणनेची आकडेवारी जारी करताना सरकारने जातनिहाय आकडेवारी जाहीर करण्याचे टाळले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)आकडेवारीत बिहारच मागेबिहारमधील विधानसभा निवडणुकींमुळे राजकीय कारणास्तव जातनिहाय आकडेवारी टाळण्यात आल्याचा आरोप जेटलींनी फेटाळून लावला. जातींच्या आकडेवारीचे जे राज्य राजकारण करीत आहे त्या राज्याने जातनिहाय संकलित आकडेवारीसंबंधी शिफारस लवकरात लवकर पाठविली तर चांगले राहील, असा टोलाही त्यांनी हाणला. देशाच्या महानिबंधकांनी देशभरातील ४६ लाख जाती, उपजाती, विविध आडनावे आणि वंशांची नावांची वर्गवारी आठ ते नऊ महिन्यांपूर्वीच राज्यांकडे एकत्रित संकलनासाठी पाठविली आहे. पनगरिया यांच्या नेतृत्वातील समितीला पूर्ण आकडेवारी मिळाल्यानंतरच पडताळणी शक्य होईल. ही संकलित आकडेवारीचा तपशील दडवून ठेवत ती जारी करण्याची मागणी केली जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.विरोधकांच्या एकजुटीमुळे अडचणसंसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस, डाव्यांसह सर्व विरोधी पक्ष जात जनगणनेची आकडेवारी जारी करण्याच्या मागणीसाठी एकजूट होत आक्रमक बनल्याने सरकारची अडचण वाढली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एकत्र आलेले राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि जेडीयूचे नेते तथा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातींच्या आकडेवारीची मागणी करीत दंड थोपटले आहेत.