शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

ग्रंथराज ज्ञानदेवाचे अलौकिकत्व अनुभवा - पुरुषोत्तम महाराज आकोटात गुरुमाऊली जयंती पर्वाचा भक्तिमय प्रारंभ

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

आकोट : ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अमृततत्त्वाला परमत्वाचा स्पर्श होता. माऊलींच्या व्यक्तित्वात संत्व, कवित्व आणि विश्वत्व यांचा त्रिवेणी संगम आहे. या ग्रंथराज ज्ञानेश्वरी अलौकिकत्व अनुभवा आणि धन्य व्हा, असे प्रतिपादन धर्मशास्त्राचे अभ्यासक हभप पुरुषोत्तम महाराज बावस्कर यांनी श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे संत वासुदेव महाराज जयंती महोत्सव १४ फेब्रुवारीला प्रारंभी केले.

आकोट : ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अमृततत्त्वाला परमत्वाचा स्पर्श होता. माऊलींच्या व्यक्तित्वात संत्व, कवित्व आणि विश्वत्व यांचा त्रिवेणी संगम आहे. या ग्रंथराज ज्ञानेश्वरी अलौकिकत्व अनुभवा आणि धन्य व्हा, असे प्रतिपादन धर्मशास्त्राचे अभ्यासक हभप पुरुषोत्तम महाराज बावस्कर यांनी श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे संत वासुदेव महाराज जयंती महोत्सव १४ फेब्रुवारीला प्रारंभी केले.
दरम्यान, सप्ताहातील विविध कार्यक्रमांचा प्रारंभ तीर्थस्थापनेने झाला. संस्थेचे विश्वस्त दादाराव पुंडेकर यांचे हस्ते सपत्नीक तीर्थस्थापना व पूजन पार पडले. पहाटे दिनकर तराळे एदलापूर यांनी गुरुमाऊलींचा अभिषेक केला. संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव हिंगणकर व उपाध्यक्ष गंगाधर गोहाड यांनी गुरूपूजन करून वारकरी ध्वजवंदन केले. याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर, सचिव रवींद्र वानखडे, विश्वस्त त्र्यंबकराव काळमेघ, सदाशिवराव पोटे, महादेवराव ठाकरे, दिलीप हरणे, अनिल कोरपे, अशोकराव पाचडे, प्रा. साहेबराव मंगळे, प्रभाकरराव ढगेकर, अंबादास होनाडे, मधुकरराव तराळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वरी पारायणाला गावोगावचे भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारायणपीठाचे नेतृत्व अंबादास महाराज व वासुदेव महाराज अस्वार यांनी केले. दुपारचे प्रवचनसत्रात हभप जगदीश महाराज वाघागड यांनी संत वासुदेव महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून या संतत्वाला अभिवादन केले. त्यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांनी केले. रात्री कीर्तनमालेचे प्रथम पुष्प हभप प्रभाकर महाराज गंगाखेडकर यांनी गुंफले. कीर्तनाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
फोटो क्र.१४ एकेटीपी०७
*** इन्फोबॉक्स ....
आजचे कार्यक्रम
सकाळी ८ वाजता : श्री ज्ञानेश्वरी पारायण
दुपारी ३ वाजता : इंजि. बाळकृष्ण आमले यांचे प्रवचन
रात्री ८ वाजता : हभप पुरुषोत्तम महाराज बावस्कार यांचे कीर्तन