शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रोचा विस्तार व्हावा

By admin | Updated: October 2, 2015 03:44 IST

नागपूर मेट्रो प्रकल्पाचे काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण व्हावे, यासाठी जर्मनीच्या ‘केएफडब्ल्यू’ सरकारी बँकेने या प्रकल्पास ५० कोटी युरोचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीनागपूर मेट्रो प्रकल्पाचे काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण व्हावे, यासाठी जर्मनीच्या ‘केएफडब्ल्यू’ सरकारी बँकेने या प्रकल्पास ५० कोटी युरोचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे. जर्मन बँकेची ही घोषणा देशातील अन्य मेट्रो प्रकल्पांच्या तुलनेत नागपूर मेट्रोचे काम अधिक वेगाने पुढे जात असल्याचे संकेत देणारी आहे.नागपूर मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि ‘केएफडब्ल्यू’च्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवेळी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा विशेषत्वाने उपस्थित होते. उपराजधानीच्या आजूबाजूच्या भागांपर्यंत नागपूर मेट्रोचा विस्तार व्हावा, अशी भूमिका गडकरी व दर्डा द्वयींनी या बैठकीत मांडली. नागपूर मेट्रो प्रकल्प किफायतशीर व्हावा, यावरही उभयतांनी भर दिला. देशाच्या पायाभूत विकासात गुंतवणुकीच्या शक्यता तपासण्याची विनंती गडकरी व दर्डा यांनी यावेळी जर्मन शिष्टमंडळास केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील अन्य मेट्रो कोचपेक्षा नागपूर मेट्रो कोचसाठी वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन तयार केले जात आहे.या बैठकीत गडकरींनी पायाभूत विकास योजनांवर प्रकाश टाकत वेगाने सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकाम कार्याची माहिती दिली. गत वर्षभरात राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचे प्रतिदिन १३ किमीचे लक्ष्य वाढवून प्रतिदिन ३० किमीपर्यंत पोहोचले आहे. यापुढील टप्प्यात हे लक्ष्य प्रतिदिन ४० किमीपर्यंत नेण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.दर्डा आणि गडकरी यांनी जर्मन बँक अधिकाऱ्यांना नागपूर मेट्रोच्या धर्तीवर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचीही गळ घातली. नागपूरप्रमाणेच पुणे मेट्रोसाठीही कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे दर्डा यावेळी म्हणाले. याचदरम्यान पुणे येथे दर्डा यांच्या उपस्थितीतच आपण मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याची घोषणा केली होती, असे गडकरींनी सांगितले.--------- सौर ऊर्जेने चालतील बंदरेभारतातील बंदरांचे रुपडे पालटून ती जागतिक दर्जाची केली जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘केएफडब्ल्यू’च्या शिष्टमंडळास दिली. सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेने ही बंदरे चालतील. बंदरांच्या विकासासाठी भारत डॉलरमध्ये कर्ज घेऊन डॉलरमध्येच त्याची परतफेड करेल. आधुनिकीकरणानंतर ही सर्व बंदरे नफ्यात असतील, असेही त्यांनी सांगितले.वॉटर हायवे बनविण्याचे स्वप्नजगात वाहतुकीसाठी ३० ते ४० टक्के जलमार्गांचा वापर होतो. भारतात हे प्रमाण केवळ ३ टक्के आहे. युरोप आणि जपानमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ४० टक्के व ४४ टक्के आहे, असे सांगत भारतात ११० नद्यांना जोडून वॉटर हायवे अर्थात जलमहामार्ग बनविण्याचे आपले स्वप्न असल्याचे नितीन गडकरी यांनी या बैठकीत सांगितले.लोकमत समूहाची प्रशंसालोकमत वृत्त समूहाची आपल्या सर्व आवृत्त्या सौरऊर्जेद्वारे संचालित करण्याची योजना असून यादिशेने काम सुरू असल्याचे खासदार विजय दर्डा यांनी ‘केएफडब्ल्यू’ बँकेच्या अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेदरम्यान सांगितले. जर्मन बँकेच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाची प्रशंसा करीत यात प्रचंड स्वारस्य दाखवले.