शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

EXIT POLL- पंजाबमध्ये होणार सत्तांतर, काँग्रेस की आप ?

By admin | Updated: March 9, 2017 18:39 IST

पंजाबमध्ये सत्तांतरण होण्याचा अंदाज आज तक आणि सीसेरो यांच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतपंजाब, दि. 9 - पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज आज तक आणि सीसेरो यांच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. पंजाब राज्य भाजपाच्या हातातून निसटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा आघाडीला फक्त 4 ते 7 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर अनेक वर्षं सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला 62 ते 71 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आज तक आणि सीसेरोच्या एक्झिट पोलमुळे काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पंजाब विधानसभेत बहुमतासाठी 59 जागांची गरज लागणार आहे. तर अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला 42 ते 51 जागा मिळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे इंडिया टीव्ही आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलनं पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजपा + अकाली दल 9, काँग्रेस 45, तर आम आदमी पार्टीला 63 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी एकहाती सत्ता स्थापन करण्याचा अंदाज इंडिया टीव्ही आणि सी व्होटरनं व्यक्त केला आहे. इतर ठिकाणी भाजपा सत्तेवर येणार असले तरी पंजाबमध्ये पुन्हा कमळ फुलण्याची शक्यता धुसर झाली आहे. गेल्या पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अकाली दलानं 56 जागा, तर त्यांचा सहयोगी पक्ष भाजपानं 12 जागा जिंकल्या होत्या. भाजपा आणि अकाली दल यांनी युती करत 68 जागांसह दुस-यांदा सरकार स्थापन केलं होतं. तर 2012मध्ये काँग्रेसला 46 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. मात्र त्यानंतर आता पुन्हा काँग्रेस भाजपाकडून सत्ता खेचून आणण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.