शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Exit Poll : उत्तराखंडमध्ये भाजपाचे पुनरामगन की त्रिशंकू विधानसभा

By admin | Updated: March 9, 2017 19:01 IST

एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केल्याने उत्तराखंडमधील निकालांबाबत उत्सुकता

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9  -  उत्तराखंडमध्ये दणदणीत बहुमतासह भाजपाचे सत्तेत पुनरागमन होईल असा अंदाज न्यूज-24 आणि टुडेज चाणक्यने वर्तवला आहे. मात्र इंडिया टीव्ही आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केल्याने उत्तराखंडमधील निकालांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

उत्तराखंडचे वर्तमान मुख्यमंत्री हरिश रावत यांनी सत्ता कायम राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. पण भाजपानेही सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली होती. दरम्यान, न्यूज 24 आणि टुडेज चाणक्यचा एक्झिट पोल भाजपासाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. 71 सदस्य असलेल्या उत्तराखंडच्या विधानसभेत भाजपाला 53 जागांसह निर्विवाद बहुमत मिळेल असा दावा या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहेत. न्यूज-24 आणि टुडेज चाणक्यने या पोलमध्ये काँग्रेसला 15 आणि इतरांना केवळ दोन जागा दिल्या आहेत.

तर इंडिया टुडे आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये कांटे की लढत झाल्याचे सांगितले आहे. या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. सी व्होटरनेही उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 32 जागा मिळतील, असे भाकीत आपल्या एक्झिट पोलमधून केले आहे.उत्तराखंडमध्ये 2012 च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसने इतर पक्षांच्या साथीने सरकार स्थापन केले होते. त्या निवडणुकीत काँग्रेसने 32 तर भाजपाने 31 जागा जिंकल्या होत्या. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या खात्यात 3 जागा गेल्या होत्या. अन्य पक्षांनी 4 जागांवर विजय मिळवला होता.