शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रोजगारांची धाव केवळ पकोड्याचा ठेला, पानाच्या टपऱ्यांपर्यंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:08 IST

प्रतिवर्षी एक कोटी रोजगारांची प्रतीक्षा कायम; चार वर्षांत सरकारमार्फत जेमतेम ४ लाख ४३ हजार नोकºयांच मिळाल्या

सुरेश भटेवरानवी दिल्ली : दरवर्षी १ कोटी लोकांना रोजगार हे आश्वासन देऊ न केंद्रात मोदी सरकार आले, पण गेल्या ४ वर्षांत जेमतेम ४ लाख ४३ हजार नोकºयाच सरकारमार्फत मिळाल्या. त्यात २0१४च्या त्या चार महिन्यांचाही समावेश आहे, ज्या काळात यूपीए सरकार होते.बेरोजगारीतून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जुलै २0१५मध्ये नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलचे उद्घाटन केले. नोकºया मागणारे व देणारे एकाच प्लॅटफॉर्मवर यावेत, हा याचा उद्देश. त्यावर ४ कोटींहून अधिक बेरोजगारांनी व सुमारे १५ लाख एम्प्लॉयर्सनी नोंदणी केली, पण फक्त २ लाख ३७ हजार नोकºया मिळू शकल्या. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारने २0१५ साली १.५५ लाख, २0१६ साली २.३१ लाख नव्या नोकºया मिळवून दिल्या. म्हणजे ४ वर्षांत ४ लाख ९३ हजार नोकºया.विरोधकांना प्रत्युत्तर देताना रस्त्यांवर पकोडे विकणे हा रोजगारच आहे, असा सिद्धांत मोदींनी मांडला. राज्यसभेत अमित शाह यांनी त्याचा पुनरुच्चार केला. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी तर बेरोजगारांना पानाच्या टपºया उघडण्याचा वा गायी पाळण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे मोदी सरकारचे १ कोटी रोजगारांचे आश्वासन पकोड्याचा ठेला अन् पानाच्या टपरीवरच थांबले आहे.देशात नोकºयांचे प्रमाण कमी होत आहे. पाच वर्षांहून अधिक काळ जी पदे रिकामी होती, अशा ४ लाख १२ हजार नोकºया गेल्या वर्षी केंद्राने कायमच्या रद्द केल्या, तसेच २0१३ च्या तुलनेत २0१५ साली केंद्रातील ७४ मंत्रालयांच्या नोकºयांत ८९ टक्के घट झाली.महाराष्ट्राच्या अर्थमंत्रालयाने ३ डिसेंबर १७ रोजी एक परिपत्रक प्रत्येक खात्याला पाठविले. प्रत्येक सरकारी विभागात ३0 टक्के नोकरकपातीचा उद्देश त्यात असून, आउटसोर्सिंग, आॅटोमेशन इत्यादी मार्गाने या मनुष्यबळाची कसर भरून काढा, असे आदेशही त्यात आहेत.नोकºयांचाहीजुमला होता का?मोदींनी २0१४ सालच्या निवडणूक प्रतिवर्षी १ कोटी नोकºया व रोजगारांचे अभिवचन दिले.पंतप्रधानांच्या चार वर्षांनंतर बहुधा लक्षात आले असावे की, मुद्रा बँक, स्टँडअप, स्टार्टअप, मेक इन इंडिया हे प्रयोग बेरोजगारीचे भगदाड बुजविण्यात अपयशी ठरले आहेत.नोटाबंदीच्या उत्साही प्रयोगानंतर लघुउद्योगांसह उत्पादन क्षेत्राची वाट लागली आहे. एकूण २५५ प्रकारच्या रोजगारांना कमाई मिळवून देणारा रिअल इस्टेटचा व्यवसाय मृतप्राय आहे. त्यामुळे दरवर्षी १ कोटी नोकºयांची घोषणाही जुमला ठरला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी