शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जादा मुद्रांक शुल्क-

By admin | Updated: July 31, 2015 23:54 IST

(सूचना: बुधवारी ही बातमी पाठविण्यात आली होती. ज्यांनी वापरली नसेल त्यांच्यासाठी पुन्हा पाठवत आहोत)

(सूचना: बुधवारी ही बातमी पाठविण्यात आली होती. ज्यांनी वापरली नसेल त्यांच्यासाठी पुन्हा पाठवत आहोत)
.................................................
जादा मुद्रांक शुल्क, दुप्पट विकास शुल्क
- सरकारचा दणका; विकासाचा फटका
सामान्यांच्या खिश्याला
यदु जोशी
मुंबई - मेट्रो, मोनो रेल्वेसह सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था निर्माण करण्याचा खर्च मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ करीत सामान्यांच्या खिश्यातून काढण्याची मूभा महापालिका वा स्थानिक प्राधिकरणांना देण्यात आली आहे. त्याचवेळी या ठिकाणी विकास शुल्क दुप्पट करून सरकारने आणखी एक दणका दिला आहे.
मुद्रांक शुल्क १० टक्क्यांपर्यंत गेल्याची ओरड झाल्यानंतर तत्कालिन आघाडी सरकारने २००२ मध्ये हे शुल्क ४ टक्क्यांपर्यंत खाली आणले होते. त्यानंतरच्या काळात त्यात हळूहळू वाढ होत गेली आणि ते सात टक्क्यांवर गेले. आता नागरी परिवहन प्रकल्प होत असलेल्या वा होणार असलेल्या शहरांमध्ये मुद्रांक शुल्कात आणखी एक टक्का वाढ करण्याची अनुमती देणारे विधेयक विधानसभेत आज गदारोळात मंजूर करण्यात आले. स्थावर मालमत्तेची विक्री, दान आणि गहाण या व्यवहारांवर हे जादाचे एक टक्का मुद्रांक शुल्क आकारता येणार आहे. सूत्रांनी सांगितले की सामान्यांवर बोजा टाकणारा हा निर्णय घेऊ नये, असे मत नगरविकास विभागाने व्यक्त केले होते पण ते बेदखल करीत सरकारने वाढीचा निर्णय घेतला.
पायाभूत सुविधांचा विचार करता मेट्रो, मोनो रेल्वेसह नागरी परिवहन प्रकल्प, मुक्त मार्ग, सागरी सेतू हे आज परवलीचे शब्द बनले आहेत. त्यांच्या उभारणीने विकासाचे नवे पर्व येईल, असा दावा केला जात असतानाच त्यासाठी नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार असल्याचे आज मंजूर झालेल्या विधेयकावरून स्पष्ट झाले आहे. नागरी वाहतूक प्रकल्प होणार असलेल्या शहरांमध्ये सध्याचे विकास शुल्क दुप्पट करण्याची तरतूद असलेले महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमाच्या कलम १२४ मध्ये सुधारणा करणारे विधेयकही विधानसभेत गोंधळात मंजूर झाले.
सध्याच्या दरानुसार जमीन विकासापोटी वार्षिक दर तक्त्याच्या (एएसआर) ०.५ टक्के शुल्क आकारले जाते. तर, बांधकामासाठी एएसआरच्या २ टक्के शुल्क आकारले जाते. दोन्हींमिळून २ टक्के शुल्क आतापर्यंत आकारण्यात येत होते. आता ते १ टक्का आणि
४ टक्के असे मिळून ५ टक्के आकारले जाईल.
--------------------------------
मोदींच्या स्वप्नाचे काय होणार?
विकास शुल्कात केलेली दुप्पट वाढ आणि स्थावर मालमत्ता विक्रीवर एक टक्का जादा मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयाचा फटका सामान्यांना आणि विशेषत: गृहनिर्माण क्षेत्राला बसेल. सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितले आहे. त्याला छेद देणारे हे दोन्ही निर्णय असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
-------------------------------
त्यांना प्रिमियम का नाही?
प्रादेशिक योजनेंतर्गत येणार्‍या जमिनींसाठी औद्योगिक ते रहिवासी असा वापरात बदल करायचा असल्यास २० टक्के प्रिमियम आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वास्तविक पाहता अनेक महापालिकांच्या क्षेत्रामध्ये सरकारने पूर्वीपासून बड्या उद्योगांना जमिनी नाममात्र दराने वाटप केलेल्या आहेत. अशा जमिनींचा वापर अनेक ठिकाणी मॉल्स, गगनचुंबी इमारतींसाठी झाला आहे. आतापर्यंत त्यासाठी प्रिमियम आकारला नाही. यापुढे असा वापर बदलल्यास शासनाने प्रिमियत आकारला तर कोट्यवधींचे उत्पन्न सरकारला मिळेल पण त्याकडे डोळेझाक केली जात आहे.
--------------------------------