भारत-पाकसोबतच्या संबंधांसाठी एक दुसऱ्याचा बळी नाही-अमेरिकावॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर जात असलेल्या बराक ओबामा यांच्या कार्यक्रम पत्रिकेवरून पाकिस्तान गायब आहे. यावरून अटकळबाजी सुरू असताना व्हाइट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने मात्र अमेरिकेचे दोन्ही देशांसोबतचे संबंध चांगले असून त्यात भेदभावाला थारा नसल्याचे म्हटले आहे. भारताला भेट देताना पाकिस्तान दौऱ्यावर न जाणारे ओबामा हे जिमी कार्टर यांच्यानंतरचे दुसरे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. कार्टर हे जानेवारी १९७८ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते; मात्र तेव्हा पाकिस्तानात झिया-उल-हक यांनी लष्करी बंड घडवून झुल्फीकार अली भुत्तो यांचे सरकार उलथवून टाकले असल्यामुळे कार्टर यांनी पाकला जाणे टाळले होते. ओबामांनी नोव्हेंबर २०१० मधील पहिल्या भारत दौऱ्यादरम्यानही पाकला जाणे टाळले होते; मात्र इतर सर्व अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी भारत दौऱ्यावर येताना पाकलाही भेट दिली होती. आमचे भारतासोबत चांगले संबंध असू शकतात त्याचप्रमाणे आमचे पाकसोबतही चांगले संबंध असू शकतात, अशी अमेरिकेची भूमिका असून ती स्पष्ट करणे गरजेचे आहे. ओबामा २०१० मध्ये भारताच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हाही त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली होती, असे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन ऱ्होड्स यांनी सांगितले. अफवा पसरविणारा तरुण अटकेतपणजी : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा पसरविणाऱ्या युवकाला गोव्यात अटक करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातील १९ वर्षीय युवकाने बुधवारी दिल्ली पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून ओबामांवर हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांचे दूरध्वनी संभाषण आपण ध्वनीमुद्रित केले असल्याचे म्हटले होते. हा तरुण प्रजासत्ताक दिन सोहळा पाहण्याची संधी न मिळाल्याने नाराज होता. त्यानंतर कुनकोलिम पोलिसांनी मोबाईल फोनच्या कॉलआधारे या तरुणाला पकडले. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याची पणजीहून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली, असे पोलिस अधिक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी सांगितले. प्रसिद्धी मिळविण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे या तरुणाने कबूल केले. त्याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली.
पाकला वगळून दुसरा भारत दौरा
By admin | Updated: January 23, 2015 01:51 IST