नाशिक (दि.९) : महाराष्ट्रात वास्तव्य करणार्या माजी सैनिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी देवळाली तोफखाना केंद्रातील तोपची सभागृहात आयोजित १३३व्या पेन्शन अदालतीचे उद्घाटन रक्षा लेखा अपर महानियंत्रक बनवारी स्वरूप यांच्या हस्ते करण्यात आले. अदालतीत २०५ तक्रारी प्राप्त झाल्या. सदर अदालत शुक्रवारीही (दि.१०) सुरू राहणार आहे. नाशिकमध्ये दुसर्यांदा या विशेष पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण खात्याच्या सूचनेनुसार अलाहाबाद येथील रक्षा लेखा प्रधान नियंत्रकच्या वतीने या पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बनवारी स्वरूप यांनी, १ जानेवारी २००६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना सहाव्या वेतन आयोगासंदर्भात देण्यात आलेल्या लाभाची माहिती दिली, तर प्रमुख अतिथी अलाहाबाद येथील रक्षा लेखा प्रधान नियंत्रक डॉ. जी. डी. पुंगले यांनी माजी सैनिकांच्या पेन्शन प्रकरणांच्या कामकाज पद्धतीत पारदर्शकता असल्याचे सांगत त्यांच्या शंका-समाधानासाठी पेन्शन कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. देशातल्या कोठल्याही कोपर्यातून १८००-१८०-५३२१ या क्रमांकावर संपर्क केल्यास त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊ शकते, असेही पुंगले यांनी सांगितले. यावेळी आर्टिलरी स्कूलचे लेफ्टनंट जनरल ए. के. मिश्रा, तोफखाना केंद्राचे ब्रिगेडियर पी. आर. मुरली, ब्रिगेडियर संजीव तिवारी, संदीप ठाकूर आदिंसह अधिकारीवर्ग उपस्थित होता. या अदालतीत माजी सैनिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी २०५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील काही तक्रारींचे निवारण करण्यात आले. फोटो कॅप्शन- आरला ०९ अदालत या नावाने सेव्ह केला आहे.माजी सैनिकांच्या पेन्शन अदालतीचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना रक्षा लेखा अपर महानियंत्रक बनवारी स्वरूप. समवेत ए. के. मिश्रा, डॉ. जी. डी. पुंगले आदि.
माजी सैनिकांच्या पेन्शन अदालतीत २०५ तक्रारी प्राप्त १३३वी अदालत : नाशकात दुसर्यांदा आयोजन
By admin | Updated: July 10, 2015 00:34 IST