शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मोदींची शिष्टाई माजी सैनिकांनी धुडकावली

By admin | Updated: August 18, 2015 22:21 IST

माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शनसाठी (ओआरओपी) जंतरमंतरवर चालविलेले आंदोलन मागे घ्यावे यासाठी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा

नवी दिल्ली : माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शनसाठी (ओआरओपी) जंतरमंतरवर चालविलेले आंदोलन मागे घ्यावे यासाठी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी निदर्शनकर्त्यांच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी केलेली चर्चा निष्फळ ठरली. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा प्रस्तावही धुडकावत आणखी दहा दिवस तरी आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही माजी सैनिकांनी दिला आहे. मंगळवारी आणखी एका माजी सैनिकाने बेमुदत उपोषण सुरू केल्याने उपोषणकर्त्यांची संख्या तीन झाली आहे. ६५ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. मिश्रा यांनी सकाळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आश्वासन दिल्याखेरीज मागे हटणार नसल्याचे आम्ही त्यांना सांगितले आहे, असे अध्यक्ष लेप्ट. जन. (निवृत्त) बलबीरसिंग यांनी म्हटले. आम्ही याआधीच संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत चर्चेच्या फेऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेसाठी दहा दिवसांची मुदत मागितली आहे. तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असे मेजर जन. (निवृत्त) सतबीरसिंग यांनी सांगितले. ओआरओपीची व्याख्या कायम ठेवतानाच या योजनेच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित करण्याचे आश्वासन मागितले. १ एप्रिल २०१४ पासून सरकारने ही योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते त्यावर ठाम राहावे, असे आम्ही स्पष्ट केल्याचे त्यांनी नमूद केले. बलबीरसिंग यांच्यासोबत त्यांनी मिश्रा यांची भेट घेतली होती. यापूर्वी दोन माजी सैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)