शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

माजी कर्नलच्या मुलीच्या डोक्यात इसिसचे भूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2015 09:20 IST

दिल्लीच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीने जगातील सर्वाधिक निर्दयी समजल्या जाणाऱ्या

नवी दिल्ली : दिल्लीच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीने जगातील सर्वाधिक निर्दयी समजल्या जाणाऱ्या इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेत सामील होण्याची जिद्द पकडली असून इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी तिच्या डोक्यात शिरलेले हे वारे काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.अलिकडच्या काळात भारतातील तरुण इसिसकडे आकर्षित होत असल्याचे चित्र समोर आले असून त्यांना रोखण्याकरिता सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच या तरुणीची ही इच्छा ऐकून गुप्तचर यंत्रणेला हादरा बसला आहे.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीचे वडील भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती आॅस्ट्रेलियाला गेली होती. परंतु तेथून परतल्यानंतर ती पूर्णपणे बदलली होती. तिच्या वडिलांनी काही महिन्यांपूर्वी तिच्या संगणकावर काही संवाद बघितले. पाठपुरावा केला तेव्हा आपली मुलगी इसिसमध्ये भरती करणाऱ्या लोकांच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलगी सिरियात जाऊन इसिसमध्ये सामील होण्याची योजना आखत असल्याचे बघून त्यांना मोठा धक्का बसला. धर्मांतर करून आॅस्ट्रेलियामार्गे सिरियाला जाण्याची तयारी तिने चालविली होती. ही संपूर्ण माहिती खुद्द या तरुणीच्या वडिलांनी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिली आणि मदतीचीही विनंती केली. एनआयएने यासंदर्भात आयबीशी संपर्क केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)