शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम छेडछाड प्रकरण : निवडणूक आयोगासोबत आज सर्वपक्षीयांची बैठक

By admin | Updated: May 12, 2017 08:58 IST

ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही बैठक सुरू होणार आहे. बैठकीत सहभागी होणारे सर्व राजकीय पक्ष ईव्हीएम गोंधळासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आपाआपले म्हणणे मांडणार आहेत. 
ईव्हीएममध्ये गौडबंगाल असल्याचा आरोप करत विरोधकांकडून पुढील निवडणुकांत व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) सुविधेने युक्त इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीनचा वापर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. 
 
या सर्वपक्षीय बैठकीत आम आदमी पार्टीचे प्रतिनिधीत्व आमदार सौरभ भारद्वाज करणार आहेत. ईव्हीएम गोंधळ मुद्याबाबत आम आदमी पार्टीनं दावा केला आहे की ईव्हीएममधील ROM च्या मदतीनं यंत्रात छेडछाड करण्यात आल्याचे सिद्ध केले जाऊ शकते.  ईव्हीएममध्ये फेरफाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोगाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही आम आदमी पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
 
यासंदर्भात पक्ष कार्यालयात मीडियासोबत संवाद साधताना "आप"चे राष्ट्रीय प्रवक्ता आणि आमदार सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, ईव्हीएम छेडछाडसंदर्भात चर्चा करताना दोन प्रश्न प्रामुख्यानं उपस्थित राहतात. पहिला प्रश्न, ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते? याचं उत्तर मंगळवारी दिल्ली विधानसभेत प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आले. जे संपूर्ण पाहिलं. दुसरा प्रश्न असा आहे की, काही राज्यांमध्ये नुकत्याचा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये छेडछाड झाली आहे का ? हा गोंधळ सिद्ध करण्यासाठी आम्हाला निवडणबक आयोगाच्या सहकार्याची गरज आहे. 
 
अलीकडे वापरलेले कोणतेही एक ईव्हीएम आम्हाला द्या, आम्ही ते हॅक करून दाखवू, असे आव्हान आम आदमी पार्टीने गुरुवारी निवडणूक आयोगाला दिले. तत्पूर्वी पुढील निवडणुकांत व्होटर व्हेरिफायेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) सुविधेने युक्त इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीनचा वापर करावा, या मागणीसाठी आपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी निवडणूक आयोगासमोर धरणे धरली.
 
आपने ईव्हीएमसारख्या उपकरणात फेरफार शक्य असल्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. मात्र, आयोगाने आपचा दावा फेटाळला होता. त्या पार्श्वभूमीवर आपने हे आव्हान दिले.  हे प्रात्यक्षिक आंदोलकांत पक्षांच्या आमदारांसह दिल्लीचे नवनियुक्त समन्वयक गोपाल राय यांचा समावेश होता.