शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

EVM म्हणजे एव्हरी वोट फॉर मोदी - योगी आदित्यनाथ

By admin | Updated: April 29, 2017 20:30 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी गोरखपूर येथे ईव्हीएम म्हणजे "एव्हरी वोट फॉर मोदी" असा नवा फुलफॉर्म सांगितला.

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 29 -  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी गोरखपूर येथे ईव्हीएमचा नवा फुल फॉर्म सांगितला. ईव्हीएम म्हणजे "एव्हरी वोट फॉर मोदी" असा नवा फुलफॉर्म त्यांनी सांगितला. 
 
त्यांच्या या विधानाचाच दाखला देत आता विरोध ईव्हीएम गोंधळाचा विषय आणखी वाढवण्याची शक्यता आहे. कारण ईव्हीएममधील कोणतेही बटण दाबले की भाजपलाचा मत जाते, असा आरोप विरोधी पक्षातील नेते करत आहेत.  
बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 
 
ईव्हीएमबाबत विरोधक अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. जी लोकं स्वतः ईव्हीएमद्वारे निवडून आले ती स्वतः ईव्हीएमसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ईव्हीएमसोबत कुणी छेडछाड करेल तर ती स्वतःहून बंद पडेल, असेही ते यावेळी म्हणालेत. 
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूरचा हा दुसरा दौरा आहे. 
यावेळी त्यांनी राज्यातील गुन्हेगारांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. कायदा हातात घ्यायचा असेल तर राज्य सोडा, अशा शब्दांत त्यांनी गुन्हेगारांना ठणकावले आहे.
 
दरम्यान, 30 एप्रिलपर्यंत योगी येथे राहणार आहेत. भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना योगी म्हणाले की, महिन्याभरात कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा आणणार असून कायदा हाती घेणा-यांची सुटका होणार नाही. 
महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसंच शेतक-यांच्या अधिकारांमध्येही  तडजोड केली जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणालेत. उत्तर प्रदेशला विकास आणि सुरक्षेच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ बनवायचे आहे. यासाठी तुमचे सहकार्य हवे, असल्याचेही आवाहन योगींनी कार्यकर्त्यांना केले. 
 

दरम्यान,  उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये गौडबंगाल असल्याचा मुद्दा उपस्थित करत यामागे भाजपा असल्याचा आरोप केला होता.  आता मायावती व केजरीवाल यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळाले.   
 
तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवणं आवश्यक आहे, अशा आशयाचे ट्विट अखिलेश यांनी केले आहे. इंटरनेट कनेक्शनशिवाय रिमोटद्वारे चिपच्या सहाय्याने पेट्रोल चोरी केली जाऊ शकते, त्याचप्रमाणे ईव्हीएममध्येही छेडछाड होणं शक्य आहे, असे ट्विट करत अखिलेश यांनी ईव्हीएम गोंधळावरुन भाजपाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.  उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मायावती यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत भाजपावर हल्लाबोल चढवला होता.