बारामती शहरात भरदिवसा घरफोडी
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
२ किलो चांदीचे दागिन्यांसह ऐवज लंपासबारामती : बारामती शहरात भर दिवसा बंगल्याचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रकमेसह १ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी राजेंद्र दत्तात्रय रासने (वय ४५, देवतानगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. रासने हे सोमवारी (दि. ६) सकाळी साडेदहा ...
बारामती शहरात भरदिवसा घरफोडी
२ किलो चांदीचे दागिन्यांसह ऐवज लंपासबारामती : बारामती शहरात भर दिवसा बंगल्याचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रकमेसह १ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी राजेंद्र दत्तात्रय रासने (वय ४५, देवतानगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. रासने हे सोमवारी (दि. ६) सकाळी साडेदहा वाजता शारदानगर येथील कॅ न्टीनला जाण्यासाठी पत्नीसह घराबाहेर पडले. या दरम्यान, त्यांच्या घराचे कुलूप तोडून, कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी बंगल्यातील लोखंडी कपाट उचकटून त्यातील २ किलो चांदी, १ तोळा, ३ ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने तसेच २५ हजार रुपये रोख चोरून नेले. रासने हे त्यांचा मोबाईल घरी विसरल्याने परत आले होते. यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी बाहेर पडताना रासने यांच्या मोबाईलमधील बॅटरी काढून नेली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर करीत आहेत.