आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात
By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST
नागपूर : काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि सर्वात शेवटी उमेदवारी अर्ज भरला. अर्जामध्ये जे निवडणूक चिन्ह टाकले होते ते चिन्ह सर्व उमेदवारांना वाटप झाले होते. शेवटी आयोगाने मला बोलावून कपबशी, इंजिन हे दोन चिन्ह आहेत, यापैकी कुठलेही एक निवडा, असे सांगितले. सुरुवातीला इंजिन निवडले. परंतु काही वेळाने विचार करून कपबशीला फायनल केले. कपबशी हे चिन्ह निवडणारा मी सर्वात पहिला उमेदवार होतो. कपबशीवर मी भरघोस मताने निवडून आल्यानंतर हे चिन्ह पुढे निवडणुकीत चांगलेच फेमस झाले. मी नंतर अनेक निवडणुका लढविल्या. परंतु आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात, असे माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर गुरुजी यांनी सांगितले.
आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात
नागपूर : काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि सर्वात शेवटी उमेदवारी अर्ज भरला. अर्जामध्ये जे निवडणूक चिन्ह टाकले होते ते चिन्ह सर्व उमेदवारांना वाटप झाले होते. शेवटी आयोगाने मला बोलावून कपबशी, इंजिन हे दोन चिन्ह आहेत, यापैकी कुठलेही एक निवडा, असे सांगितले. सुरुवातीला इंजिन निवडले. परंतु काही वेळाने विचार करून कपबशीला फायनल केले. कपबशी हे चिन्ह निवडणारा मी सर्वात पहिला उमेदवार होतो. कपबशीवर मी भरघोस मताने निवडून आल्यानंतर हे चिन्ह पुढे निवडणुकीत चांगलेच फेमस झाले. मी नंतर अनेक निवडणुका लढविल्या. परंतु आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात, असे माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर गुरुजी यांनी सांगितले. प्रचाराच्या दृष्टिकोनातून कपबशी हे चिन्ह निवडले होते. त्यावेळी खिशात पैसा नव्हता. प्रचारात भिंती रंगविल्या जात होत्या. भिंतीवर कपबशी रंगविणे खूप सोपे होते. कपबशी चिन्ह मिळाल्यामुळे मित्र हसलेही, पण हीच कपबशी वेगाने घराघरात पोहोचली. लोकांनी त्यावेळी भरभरून प्रेम दिले. शहरात दुसऱ्या क्रमांकाच्या लीडने निवडून आलो. मतमोजणी केंद्रावर विजयाची घोषणा झाली. प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडल्यावर खिशात एकही रुपया नव्हता. एका मित्राने लाडू भरविला व दोन हजार रुपये खिशात टाकले. मिरवणूक रॅली काढण्यासाठी एक जीप मोफत दिली. प्रचार रॅली अर्ध्यावर असताना जीपही बंद पडली. कार्यकर्त्यांनी किमान १० किलो जीप ढकलत नेली. याच मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी संदल लावला होता. मिरवणूक आटोपल्यानंतर सर्व आपापल्या घरी गेले. शेवटी संदलवाले जायचे थांबले होते. त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, पेमेंट व्हायचा आहे. खिशात मित्राने टाकलेले दोन हजार रुपये त्या संदलवाल्यांना दिले. तीनही निवडणुकीत मी भरघोस मतांनीच निवडून आलो. पुढे उपहापौर बनलो. त्यावेळी शहर विकासाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक असे काम केले. शहरातील पाणीपुरवठ्याच्या सर्व टाक्या स्वच्छ केल्या. टँकरचालकांकडून होणारी पाण्याची चोरी थांबविली. २००५ नंतर टँकरचालक कधीही संपावर गेले नाही. उपमहापौरपदाच्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी कला, क्रीडा, साहित्य या मंडळीसोबत अख्खा दिवस घालविला. अनेक पत्रकारांचे मला सहकार्य मिळाले. लोकांनी पक्षाच्या नाही मालीकर गुरुजीच्या नावावर प्रेम दिले.